📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
महाराष्ट्र

अंजनगाव सुर्जीत राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा प्रभावी दौरा

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;

अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर यांनी काल शुक्रवार दिनांक २ जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, अंजनगाव सुर्जी येथे सदिच्छा भेट देत समितीच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. या भेटीमुळे शेतकरी, व्यापारी व सहकार क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांना चालना मिळाली असून बाजार समितीच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या वेळी मेळघाटचे माजी आमदार प्रभूदास भिलावेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयंत साबळे, अर्चना पखान यांच्यासह सुधीर गोळे, दिलीप भोपळे, मनिष कोरपे, गजानन धोटे, अमोल पोटे, सतीश मट्टे, श्रीकांत पवार, कृष्णा गोमासे, शांतनू भांबुरकर, संजय ढोक, विशाल पंडित, चोरे काका, विठ्ठल सावळे, कळमकर काका, अनंत रोकडे, सुबोध कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी, बाजार समितीतील पायाभूत सुविधा, सहकार क्षेत्रातील संधी तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांचे हित जपणे, बाजार व्यवहारात पारदर्शकता राखणे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

समारोपप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयंत साबळे यांनी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीमुळे अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास प्रक्रियेला नवी दिशा व बळ मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Back to top button