📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

चिंचाळा येथे मंगळवार दिवाळी पाडव्यापासून १९ व्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

चिंचाळा येथे मंगळवार दिवाळी पाडव्यापासून १९ व्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

आष्टी प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र बाबासाहेब देवस्थान येथे  १९ व्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १० नोव्हेंबर ते मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहे.
ह.भ.प. नवनाथ महाराज पोकळे (चिंचाळा) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून, बाबासाहेब देवस्थान, महादेव मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व यादवबाबा मंदिर तसेच वामनभाऊ महाराज मंदिर चिंचाळा येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहाची सुरुवात मंगळवारी कलशपूजा व धार्मिक विधींनी होणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, हरिकीर्तन व महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यामध्ये ह.भ.प. नामधारक आसाराम महाराज, ह.भ.प. नवनाथ महाराज पोकळे, ह.भ.प. संतोष महाराज मोरे, ह.भ.प. रवींद्र महाराज काळे, ह.भ.प. सौ. पुष्पाताई महाराज जगताप, ह.भ.प. कल्याण महाराज कोल्हे व ह.भ.प. माऊली महाराज कोठुळे यांची कीर्तने होणार आहेत.
मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. महंत काशीनाथ महाराज शास्त्री (सुदर्शन संस्थान, सांगवीपाटण) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वितेसाठी समस्त तरुण मंडळ, चिंचाळा तसेच ग्रामस्थ, भजनी मंडळ आणि परिसरातील भाविक परिश्रम घेत आहेत. चिंचाळा व परिसरातील भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button