बीड

कन्या विद्यालय जामखेड येथे इंग्रजी विषयाच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन

कन्या विद्यालय जामखेड येथे इंग्रजी विषयाच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन

विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांच्या हस्ते संपन्न

जामखेड प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय जामखेड येथे इंग्रजी विषयाचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी असे दोन गट करण्यात आले या प्रदर्शनामध्ये ६० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या प्रदर्शनामध्ये इंग्रजी विषयाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिकृती तक्ते मॉडेल्स तयार केले. या तक्त्यांवर प्रतिकृती वर इंग्रजी विषयाचे संपूर्ण व्याकरण सोप्या पद्धतीने दिले. यामुळे विद्यार्थिनींच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडली. या प्रदर्शनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहिल्यानगरचे विभागीय अधिकारी माननीय नवनाथ बोडखे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी भोर,पर्यवेक्षक संजय हजारे,गुरुकुल प्रमुख व इंग्रजी विषय शिक्षक मनोहर शिंदे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी इंग्रजी विषय शिक्षक मनोहर शिंदे यांनी विद्यार्थिनींना इंग्रजी विषयाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन इंग्रजी विषय शिक्षक अशोक घोडके, शंभूदेव बडे तसेच शिक्षिका प्रियंका पवार आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

Back to top button