बीड

अजितदादा “विवेक” जागा ठेवून गतिमान सरकारला खोडा घालणाऱ्या “कर्तव्यदक्ष” नव्हे तर “इव्हेंटदक्ष” जिल्हाधिकाऱ्यांना हाकला – शेतकऱ्यांना नुकसानभरपाई निधीचा ऑगस्ट महिन्याच्या प्रस्तावाला १७ सप्टेंबर उजाडले : डॉ.गणेश ढवळे

अजितदादा “विवेक” जागा ठेवून गतिमान सरकारला खोडा घालणाऱ्या “कर्तव्यदक्ष” नव्हे तर “इव्हेंटदक्ष” जिल्हाधिकाऱ्यांना हाकला – शेतकऱ्यांना नुकसानभरपाई निधीचा ऑगस्ट महिन्याच्या प्रस्तावाला १७ सप्टेंबर उजाडले : डॉ.गणेश ढवळे
——-
बीड :-(दि.२१) राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने मदत देण्याची मागणी सर्व स्तरावर होत आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे प्रशासनाला “गतिमान” केल्याचे सांगत असले तरी बीड जिल्हा प्रशासन मात्र कागदोपत्री उपक्रम राबवण्यात व्यस्त दिसत असून, शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मात्र अनास्थाच दाखवत असल्याचा आरोप होत आहे.
३ दिवसांपूर्वीच राज्य शासनाने परभणी जिल्ह्यास मदत जाहीर केली, मात्र त्यात बीडचा समावेश नव्हता. बीड जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचा निधी मागणीचा प्रस्ताव मंत्रालयात १७ सप्टेंबरला पोहोचला आहे. म्हणजेच जिल्हा प्रशासनाकडूनच विलंब झाल्याचे चित्र उघड झाले आहे.
बीड जिल्ह्यातील “कर्तव्यदक्ष नव्हे तर इव्हेंटदक्ष” अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळेच पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या गतिमान सरकारला खोडा घातला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या जिल्हाधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यातून हकालपट्टी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.
तसेच पंचनाम्यावर वेळ न घालवता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचा प्रस्ताव
नुकसानग्रस्त शेतकरी: १ लाख १४ हजार ७७३
नुकसानग्रस्त क्षेत्र: ६६ हजार ७३१ हेक्टर
निधी मागणी: ₹५६ कोटी ७३ लाख
विशेष प्रकरण: गेवराई तालुक्यातील २ गावांतील २० हेक्टर जमीन खरडली गेली असून त्यासाठी अतिरिक्त ₹९ लाख निधीची मागणी
Back to top button