📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी डिझेल कॅड/ डब्यात द्या- भाई मोहन गुंड 

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी डिझेल कॅड/ डब्यात द्या- भाई मोहन गुंड

बीड जिल्हाधिकाऱ्याकडे शेतकरी कामगार पक्षाची मागणी
बीड (जिल्हा प्रतिनिधी)
   जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड यांचे पत्र आदेश असल्यामुळे डिझेल खुल्या स्वरुपात विकण्यास बंदी” घालण्यात आलेली आहे. सदर आदेश सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असला तरी त्यामुळे बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, वस्तुस्थिती सध्या खरीप हंगामाची पेरणी व आंतर मशागतीची कामे सुरु आहेत. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पंपसेट, जनरेटर, थ्रेशर ही सर्व अवजारे शेतावरच असतात. त्यात डिझेल भरण्यासाठी शेतकऱ्यांना कॅड/डब्यात घेतल्या शिवाय पर्याय नाही .प्रत्येकवेळी ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर नेणे शक्य नाही. अंतर 10-15 किमी असते. डिझेल संपल्यावर शेतकरी काम बंद ठेवावा लागतात, पंपावर डिझेल मिळत नाही म्हणून शेतकरी दुप्पट-तिप्पट भावाने विकत घ्यायला मजबूर होत आहेत युद्धजन्य परिस्थिती आहे हे मान्य, पण अन्नदाता शेतकरी जगला तरच देश जगेल. शेती बंद पडली तर युद्धापेक्षा मोठे संकट देशात येईल, वरील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय तात्काळ घ्यावा, ही विनंती. अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, आसा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
Back to top button