📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तरुणांनो परिवर्तनाचे शिलेदार व्हा – पृथ्वीराज पंडित

तरुणांनो परिवर्तनाचे शिलेदार व्हा – पृथ्वीराज पंडित
प्रभाग क्र. १० मध्ये महेश दाभाडे याच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद

गेवराई, दि.२४ (प्रतिनिधी) ः- विरोधकांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढळले असून सदैव विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व अमरसिंह पंडित आणि विद्यमान आ. विजयसिंह पंडित यांच्यावर  बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. परंतु तरुणांनो तुम्ही संयम बाळगून गेवराई नगर परिषदेत परिवर्तणाचे शिलेदार व्हा आणि गेवराई शहराच्या सर्वांगिन विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन युवा नेते पृथ्वीराज पंडित यांनी केले. शहरातील प्रभाग क्र. १० मध्ये पृथ्वीराज पंडित यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या रॅलीला मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे आणि प्रभाग क्र. १० मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. रेणुका शिवलिंग संभाहारे व शेख खाजा कटूमियाँ यांच्या प्रचारार्थ युवा नेते पृथ्वीराज पंडित यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांनी प्रचार रॅली काढली. प्रभाग क्र. १० मधील संतोष नगर, मोंढा नाका, कोरबू गल्ली, कल्पेश्वर मळा या भागात निघालेल्या या रॅलीला मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पंडित म्हणाले की, विरोधकांनी मागील अनेक वर्षांपासून नगर परिषद आपल्या ताब्यात असताना विकास कामांवर लक्ष न देता भावनेचे राजकारण केले, वैयक्तिक पातळीवर जाऊन टिका टिप्पणी केली. आ. विजयसिंह पंडित यांनी या टिकेला भिक न घालता आपल्या आमदारकीच्या अल्प कालावधीत ३५ कोटी रुपयांची विकास कामे गेवराईसाठी मंजुर करून आणली. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा सर्व प्रभागात होणारा गजर पाहून विरोधकांचे मानसिक संतुलन ढळल्यामुळे ते खुलेआम मतदारांना धमक्या देऊ लागले आहेत. विरोधकांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी तरुणांची फळी समर्थ आहे. परंतु तरुण कार्यकर्त्यांनी संयम दाखवावा, घड्याळ्याच्या चिन्हासमोरचे बटन दाबून गेवराई नगर परिषदेत परिवर्तनाचे शिलेदार व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अमरसिंह पंडित यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला संधी दिली – महेश दाभाडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन सर्व समावेशक राजकारण केले. अमरसिंह पंडित यांनाही स्वतःच्या घरातला उमेदवार उभा करता आला असता परंतु सामान्य कार्यकर्त्याला नगर परिषद निवडणुकीत उभा करून घराणेशाहीला फाटा दिला आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शहराचा कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी शेख अमजदभाई, जावेद पठाण, जफर पटेल, जावेद बागवान, हन्नानसेठ, नजीब चाचू, एजाज अत्तार, अकबर बाबा, दिलीप गंगवाल, शैलेश तोष्णीवाल, शांतीलाल पिसाळ, बाळू पिसाळ, बंडू मोटे, सोमेश्वर कापसे, शेख सियाज, सय्यद वाजेद, दत्ताभाऊ पिसाळ, किरण सांभाहारे, मुशीर पठाण, गणेश मोटे, गजानन कापसे, कृष्णा गळगुंडे, अंकुश गळगुंडे, गजानन कापसे, दत्ता टोणपे, रवि वाडकर, बबन शंखपाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button