📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
राजकीय

गायब असलेले अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर दिली पाहिली प्रतिक्रिया

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सचिन वाझे मार्फत १०० कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप केला. त्यानंतर या प्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली तसेच त्यांना आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता मात्र, अचानक अनिल देशमुख बेपत्ता झाले. आज अनेक दिवसांनंतर अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात हजर झालेत. त्यानंतर आज त्यांनी ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली.

 

अनिल देशमुखांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजी मांडली आहे “नमस्कार मी अनिल देशमुख बोलतोय. मला जेव्हा ईडीचा समन्स आला तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवलं की माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केलीय. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल.

देशमुख म्हणाले, “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह आज कुठे आहेत? प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार परमबीर सिंह भारत सोडून परदेशात पळून गेले आहेत असे सुद्धा त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.

Back to top button