“IPL थरार आता आपल्या गावात – दिवस-रात्र स्पर्धेने जामखेड होणार क्रिकेटमय!

“IPL थरार आता आपल्या गावात – दिवस-रात्र स्पर्धेने जामखेड होणार क्रिकेटमय!
“गाव क्रिकेटला ग्लॅमरची जोड – समाजसेवक निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य IPL स्टाईल स्पर्धा!”
जामखेड प्रतिनिधी – जामखेड तालुक्यात यंदा क्रिकेटचा ग्लॅमरस आणि थरारक अवतार पाहायला मिळणार आहे. समाजसेवक निलेश(भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त “आयकॉन प्रीमियर लीग २०२५ – पर्व पहिलं” या नावाने तालुक्यातील पहिलीच भव्य दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धा १८ एप्रिल २०२५ पासून रंगणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जामखेडमध्ये क्रिकेटप्रेमींसाठी जल्लोष आणि स्पर्धेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.
या लीगच्या आगोदर IPL पद्धतीवर खेळाडूंची लिलाव प्रक्रिया हॉटेल आमराई, जामखेड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये आठ संघमालकांनी ८० पेक्षा अधिक खेळाडूंवर बोली लावत संघ मजबूत केले. या लिलावाला स्थानिक नागरिक, नेते, आणि क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी होती.
लिलाव सोहळ्याचे अध्यक्ष जानकी (मामा) गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष महेश (दादा) निमोणकर, ल. ना. होशिंग विद्यालयाचे माजी प्राचार्य अनंता खेत्रे यांनी उपस्थिती लावली.
*स्पर्धेत सहभागी संघ व संघमालक पुढीलप्रमाणे आहेत:*
1. समता वॉरीयर्स, जामखेड – संतोष गव्हाळे व रामशेठ निमोणकर
2. मेजर ११, जायभायवाडी – अशोक मुंढे, संदीप ठोंबरे, ॲड. अमोल जगताप
3. आर्यन वॉरीयर्स, जामखेड – डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. आबेद जमादार
4. शंभूराजे सुपर किंग, जामखेड – उमेश खुपसे,आलेश जगदाळे,शकील शेख,मनोज अडाले
5. काटेवाडी वॉरीयर्स, काटेवाडी – दत्तात्रय वीर
6. मावळा क्रिकेट क्लब – सुरजशेठ मुळे,ऋषी विटकर
7. सोनपरी टायटन, जामखेड – संजय डोके, ॲड.घनशाम राळेभात
8. एम.जे. नाईट रायडर्स – जमीरभाई सय्यद (बारूद)
यावेळी मनसेचे प्रदीप टापरे, विवेक कुलकर्णी, युवा नेते राजेश वाव्हळ, नगरसेवक शामीर सय्यद, हवाशेठ सरनोबत, पोलीस अधिकारी अविनाश ढेरे, उद्धवराव हुलगुंडे, महादेव ओंबासे, संजय काळे, गोरे साहेब यांच्यासह पत्रकार व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचं सुत्रसंचालन विजय जाधव सर यांनी केलं, तर आभारप्रदर्शन अजय कोल्हे यांनी मानले .
आयोजन यशस्वी करण्यासाठी मुनाफ शेख, शिवराज विटकर, सागर आमले व तुषार म्हेत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
*प्रतिक्रिया*
ही स्पर्धा केवळ एक खेळ नसून, तरुणाईला एक व्यासपीठ, गावात एक उत्सव आणि जामखेडला एक नवा ओळख देणारा उपक्रम ठरणार आहे. आता सगळ्यांची नजर १८ एप्रिलपासून रंगणाऱ्या या रोमांचक क्रिकेट महायात्रेकडे लागली आहे!
*महेश निमोणकर*
म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष



