बीड

बीड शहरातील कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या प्रभाग क्रमांक 10 व 3 मधील पाण्याच्या टाक्या तातडीने नागरिकांच्या सेवेत उपलब्ध कराव्यात;. प्रा. सनी विष्णू वाघमारे

बीड शहरातील कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या प्रभाग क्रमांक 10 व 3 मधील पाण्याच्या टाक्या तातडीने नागरिकांच्या सेवेत उपलब्ध कराव्यात;. प्रा. सनी विष्णू वाघमारे

 *जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन*
बीड, दि. ९ जुलै : बीड शहरातील कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मोठ्या पाण्याच्या टाक्या आजही नागरिकांच्या सेवेत उपलब्ध नसल्याने त्या तातडीने कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात प्रभाग क्रमांक 10 मधील 14.60 लाख लिटर तसेच प्रभाग क्रमांक 3 मधील 6 लाख लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. या दोन्ही टाक्यांची एकूण क्षमता 20.60 लाख लिटर असून त्या कार्यान्वित झाल्यास हजारो नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ मिळू शकतो. मात्र, आजही या टाक्या बंद अवस्थेत असल्याने त्यांचा कोणताही लाभ नागरिकांना मिळत नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी बीड नगरपरिषदेला १५ व्या वित्त आयोगाचा सुमारे ४८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतील 50% निधी पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीतून आवश्यक पाइपलाइन, पंप, विद्युत जोडणी, वितरण व्यवस्था व इतर तांत्रिक कामे तातडीने पूर्ण करून या दोन्ही पाण्याच्या टाक्या नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याबाबत बीड नगरपरिषदेला निर्देश द्यावेत, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
बीड शहरात अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठ्याची समस्या कायम असताना उभारलेली पायाभूत सुविधा वापराविना राहणे ही चिंतेची बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करून दोन्ही पाण्याच्या टाक्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी केली आहे.
Back to top button