बीड

काळवीट कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार; वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन घ्यायला वेळ नाही :- डॉ. गणेश ढवळे

काळवीट कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार; वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन घ्यायला वेळ नाही :- डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश :- (दि.१२) बीड तालुक्यातील मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी शिवारातील वनपरिसरात आज बुधवार (दि.१२) सकाळी सुमारास काळवीट मृतावस्थेत आढळून आले.
काळवीटाच्या शरीरावर इतरत्र कुठेही गंभीर जखमा नसल्याचे दिसून आले, मात्र पोटाचा भाग छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीट ठार झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.
📞 वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन उचलायला वेळ नाही — डॉ. गणेश ढवळे
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी घटनेची माहिती मिळताच बीड वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल सांगुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही.
डॉ. ढवळे यांनी सांगितले की, “पूर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे हे अशा घटनांवर तत्काळ प्रतिसाद देत आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवत. परंतु सध्याचे अधिकारी सांगुळे यांनी फोन न उचलल्याने तातडीने कार्यवाही होऊ शकली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.”
यानंतर बदली होऊन गेलेले वनपाल बहिरवाळ यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी नव्या वनपाल विजय केदार यांचा मोबाईल क्रमांक दिला. त्यावरून डॉ. ढवळे यांनी त्यांना घटनेची माहिती देत वनविभागाने तत्काळ चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी केली. वनकर्मचारी येईपर्यंत कुत्र्यांनी काळवीटाचे लचके तोडु नये म्हणून लिंबाच्या झाडाच्या पानांनी झाकुन ठेवले.
या घटनेच्या वेळी नेकनूर पोलिस स्टेशनचे प्रशांत क्षीरसागर, तसेच महाजनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वंभर गिरी, विशाल घरत, संदिप घरत, ऋषिकेश घरत, शंकर घरत, सतिश घरत आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Back to top button