📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गेवराई तालुक्यातील शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड. 

गेवराई तालुक्यातील शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड.
गेवराई प्रतिनिधी ता. १०: गेवराई तालुक्यातील शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून परमेश्वर बाबुराव मोटे व उपाध्यक्ष म्हणून आकाश जानबा मोटे यांची पालक सभेमध्ये सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी शाळेतील भौतिक विकासासाठी ७० हजार रुपये देणगी दिली. याप्रसंगी गावातील सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक पाराजी मोटे, जानबा मोटे, ग्रामपंचायत सदस्य बदाम मोटे, विनोद शिंदे व गावातील सर्व पालक उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सुधिर जुगदार यांनी अभिनंदन केले तसेच समस्त उपस्थित पालकांचे अफसर मनियार व नसिम मनियार यांनी आभार मानले.
Back to top button