बीड
उमरी फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये पीक विमा द्या – राजेंद्र आमटे

उमरी फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन
शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये पीक विमा द्या – राजेंद्र आमटे
पीकं करपून चाललीत; कृत्रिम पाऊस पाडा
शेतकरी हक्क मोर्चा कर्जमाफीतील दगा फटका खपून घेणार नाहीत
बीड (प्रतिनिधी) कर्जमाफीची लढाई शेतकऱ्यांना जिंकल्यानंतर अतिवृष्टीत घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये द्या तसेच बीड जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पीकं करपून चाललीत चंद्रयान मंगळयान पाठवणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात यावा शेतकऱ्यांना सरसकट घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी द्यावी या मागणी करिता बीड जिल्ह्यात बीड पिंपळनेर रोडवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. आठ-दहा दिवसात पाऊस पडला नाही तर तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रयान मंगळयान पाठवणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात यावा. मागील वर्षी घोषणेप्रमाणे हेक्टरी सतरा हजार रुपये पिकवतो शेतकऱ्याला मदत करण्यात यावी तसेच घोषणेप्रमाणे कर्जमाफी योजनेत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, कर्जमाफी योजनेत दगा फटका केल्यास शेतकरी हक्क मोर्चा खपून घेणार नाही. याचा विचारा शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड – पिंपळनेर रोडवरील उमरद खालसा फाटा (उमरी फाटा) येथे रस्ता रोको करून शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले यावेळी राजेंद्र आमटे, बाळासाहेब मोरे, राहुल टेकाळे, अशोक येडे,रोहिदास मस्के, सुभाष गिराम, उमेश मस्के खाजाभाई पठाण, दीपक जाधव, वाणी अण्णा,जालिंदर शिंदे, बळीभाऊ मेहेत्रे,राजाभाऊ साळुंके,मसुराम साळुंके,खांडे पारगाव, नागापूर ( खुर्द, बुद्रुक) अंतरवन पिंपरी, उमरी, उमरद खालसा, बऱ्हाणपूर भाटसांगवी, राक्षस भुवन कुक्कडगाव वडगाव गुंदा, म्हाळस जवळा, म्हासापूर, पिंपळगाव मांजरा, इट गंगनाथवाडी व पिंपळनेर या परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते.



