बीड
संघर्षयोध्दा जरांगे पाटील, संपादक काळकुटे यांच्या सुरक्षेत वाढ करावी- सकल मराठासेवक गेवराई तालुका

संघर्षयोध्दा जरांगे पाटील, संपादक काळकुटे यांच्या सुरक्षेत वाढ करावी- सकल मराठासेवक गेवराई तालुका
नसता मराठा समाज आक्रमक होणार- सरकार ला दिला इशारा…
कोळगाव बाळासाहेब घाडगे – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा अरोप केल्यानंतर गेवराई तालुक्यातून मराठा समाज आक्रमक झाला असून आ. धनंजय मुंडे आणि म्होरक्या टोळीचा निषेध केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील, संपादक गंगाधर काळकुटे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करावी, आ.धनंजय मुंडे यांची अटक करून सखोल चौकशी करावी मागणी गेवराई तालुका सकल मराठासेवक यांच्याकडून करण्यात येत आहे.
मराठा आरक्षण संदर्भात मागील दोन वर्षांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचे कट कारस्थान मागील आठवड्यात उघड झाले. यामध्ये आ.धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या कट कारस्थान प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संतोष देशमुख हत्या प्रकरण, आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख, संपादक गंगाधर काळकुटे पाटील, पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत खालच्या पातळीवरील घाणेरडी भाषा आहे. यामध्ये संशयित आरोपीमधील आपसातली ऑडिओ क्लिपसह आ. धनंजय मुंडे यांच्यातील मोजक्या संवादाची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा करत ती ऐकवली. पण घातपात घडवून आणण्यापूर्वी हा डाव उधळून लावल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. ह्या आरोप नसून मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: नार्कोटेस्टची मागणी केली आहे. यामुळे समाज आक्रमक असून मराठा समाजाकडून धनंजय मुंडे यांच्या अटकेची मागणी सुरेश नवले, संतोष पाटील, संदिप गव्हाणे, आबासाहेब पाटील,चंद्रकांत माने, शरद जाधव, करण्यात येत आहे. आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी समाजास शांततेचे आवाहन केले आहे
चौकट……
गंगाधर नानाला मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे एकनिष्ठ समाज बांधव म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले…
गंगाधर काळकुटे हे मागील वीस वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काम करणारे लढावू समाजसेवक आहे. स्वर्गीय आण्णासाहेब पाटील, जावळे पाटील, विनायकराव मेटे यांच्या मराठा छावा संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने रस्ता रोको, उपोषण करत गंगाधर काळकुटे पाटील हे नाव बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात ओळखले जात होते. दरम्यान संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे गरजवंत मराठ्यांचा लढा कुणबी मराठा आरक्षण आंदोलन संदर्भात उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे एकनिष्ठ समाज बांधव म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. जरांगे पाटील यांच्या सुखात दुःखात सहभागी होवून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत समाजाचा सेवक म्हणून राहिले आहे. असे किंचक नवले, ज्ञानेश्वर काशिद, दिनेश गुळवे, बाळासाहेब घाडगे, यांनी सांगितले.
……. चौकट
गंगाधर काळकुटे हे समाजाशी प्रामाणिक असून समाजासाठी बलीदान देण्यासाठी तयार….
कुणबी मराठा आरक्षण आणि हैदराबाद सातारा गॅझेट अंमलबजावणी नंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा फायदा होत आहे. जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र समन्वयक सदस्य यांची लोकप्रियता वाढत आहे. पण म्होरक्या टोळ्या मराठा समाजाविषयी लढणारे श्रध्दास्थान असलेले संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील, त्यांचे सहकारी संपादक गंगाधर काळकुटे पाटील यांच्या विषयी षडयंत्र करत आहे. जीवे मारायला कट कारस्थान रचले जात आहे. गंगाधर काळकुटे हे समाजाशी प्रामाणिक असून समाजासाठी बलीदान देण्यासाठी तयार आहे असे सांगून संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटील गंगाधर काळकुटे पाटील यांच्या पाठीशी उभा असून असल्या भेकड धमक्यांना भीक घालत नाही. यापुढे मराठा समाजाविषयी राजकारण करणार असेल तर जशाच तैसे उत्तर दिले जाईल. असे समाजसेवक गणेश हाडुळे, भारत काशिद, कृष्णा लोंढे, बालासाहेब शेरकर,किरण कोळसे, भरत पवार, प्रकाश डोंगरे पारसनाथ काकडे, यांनी सांगितले.


