बीड

आम्ला गावातील गांजाच्या शेतीवर  तलवाडा पोलिसांची कारवाई 

आम्ला गावातील गांजाच्या शेतीवर  तलवाडा पोलिसांची कारवाई
अंदाजे वीस लाख रुपये रकमेची झाडे जप्त
सापोनी मनोज निलंगेकर यांच्या नेतृत्वात मोठी कारवाई
गेवराई प्रतिनिधी  :गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील आम्ला या गावांमध्ये एका शेतकऱ्याने स्वाताच्या  आम्ला शिवारातील शेतामध्ये (गट नंबर २१३) मध्ये बेकायदेशीररित्या अफू या पिकाची लागवड केली असल्याची माहिती गोपनीय बातमीदार यांच्याकडून प्राप्त होताच तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनि मनोज निलंगेकर, यांनी वरिष्ठांना माहिती देऊन तसेच गेवराई येथील फॉरेन्सिक टीमला बोलावून सर्व टीम, पथक यांचे सह  दिं.४/३/२०२६ रोजी दुपारी तीनच्या सुमारास वाजताच्या दरम्यान आम्ला गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन छापा टाकला असता  सदर ठिकाणी  ८० किलो अफू वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अफू प्रकरणी उपनिरीक्षक कैलास अन्नालदास यांच्या फिर्यादीवरून  ज्ञानेश्वर  कदम वय वर्षे ४० रा. आम्ला कलम एन. डी. पी. एस.अॅक्ट प्रमाणे  तलवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपनिरीक्षक स्वापनिल कोळी करीत आहेत
Back to top button