प्रभाग ५ मध्ये आमदार रोहित पवार यांची काॅर्नर सभा उत्साहात संपन्न

प्रभाग ५ मध्ये आमदार रोहित पवार यांची काॅर्नर सभा उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी :जामखेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या प्रचाराला आज वेग आला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्याताई शहाजी राळेभात तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील नगरसेवक पदाच्या उमेदवार पूजा उद्धव गडकर आणि जयश्री बजरंग डुचे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित (दादा) पवार यांनी आज शहरातील कुंभार तळे परिसरात प्रचार दौरा केला.
आमदार पवार यांनी बागवान मस्जिद परिसरात तसेच तपनेश्वर गल्लीत संतोषी माता मंदिराजवळ आयोजित कॉर्नर सभेत नागरिकांना संबोधित करत म्हटले आहे की,जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हापुढील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले.
महिला भगिनींसाठी सुरक्षित, भयमुक्त आणि विकासाभिमुख जामखेड घडविण्यासाठी सक्षम पथक आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



