बीड

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा: प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा: प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख

शहाजी (काका) राळेभात यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

जामखेड (प्रतिनिधी):
आज दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष महेबुब शेख यांनी जामखेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शहाजी (काका) राळेभात यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान संघटनात्मक आढावा घेण्यात येत तालुक्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी जेष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ पोले,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, अवधूत पवार,नगरसेवक राजेंद्र गोरे,वसिम सय्यद,माजी नगरसेवक बिभिषण धनवडे,फिरोज कुरेशी, प्रवक्ते डॉ.कैलास हजारे,माजी ग्रामपंचायत सदस्य संजय डोके, कुंडल राळेभात,पाडळीचे सरपंच बाळासाहेब खैरे, बजरंग डूचे, अशोक घुमरे, साहिल बागवान, संजय डोके,सागर जगताप, अजित अडाले, बाळासाहेब कांबळे,सचिन शिंदे, अनिल रेडे,वसिम शेख, दादा महाडिक,दिपक घायतडक,दत्तात्रय डिसले, विकास अडाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत जामखेड नगर परिषदेसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील प्रलंबित विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पुढील रणनीती, संघटन विस्तार व कार्यकर्त्यांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महेबुब शेख यांनी युवकांना पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन करत,जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करा, प्रत्येक प्रभागात संघटन मजबूत करा, अशी भूमिका मांडली.

Back to top button