बीड

गेवराईत सकल मराठा समाजाची रोजा इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे दर्शन 

गेवराईत सकल मराठा समाजाची रोजा इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे दर्शन
गेवराई दि. २१ (प्रतिनिधी):- गेवराई येथे मुस्लिम समाजाच्या रमजान या पवित्र उपवासाच्या महिन्यानिमित्त गेवराई शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने (दि.२१) शुक्रवार रोजी आयोजित केलेल्या रोजा इफ्तार पार्टी मध्ये प्रचंड संख्येने उपस्थित राहिलेल्या हिंदू- मुस्लिम बांधवांचे पुन्हा एकदा भाईचारा पाहायला मिळाला.
     शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक गेवराई येथे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे सकल मराठा समाजाच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी पवित्र रमजान महिण्यानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टी मध्ये शेकडो मुस्लिम बांधवा सोबत हिंदु बांधवांनी देखील रोजा ईफ्तार पार्टी सहभागी होवुन हिंदु – मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिसुन आला. सकल मराठा समाज गेवराई च्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी मध्ये युवा नेते रणविर पंडीत,माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, मा. नगरसेवक माऊली गंगाधर, सभापती मुजिब पठाण, ॲड.भगवान घुंबार्डे, मा.नगरसेवक संजय इंगळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, पत्रकार अय्युब बागवान, मा.नगरसेवक जानमहंमद बागवान, सामाजिक कार्यकर्ते जे डी शहा, पत्रकार काझी अमन, पत्रकार अंकुश अतकरे,पत्रकार विनोद नरसाळे, पत्रकार कैलास हदगुले, सरवरखॅा पठाण, नगरसेवक मंजुर बागवान, पत्रकार  ॲड.शेख हारुण, शिवसेना युवा नेते उध्दव मडके, बंडुसेठ गळगुंडे, समाधान मस्के, मा.उपनगराध्यक्ष शेख खाजा, मा. नगरसेवक सय्यद नजीब, ॲड.शेख अब्बास ,कृष्णा मोटे, गणेश पवार, ओम कानगुडे,रामेश्वर पानखडे, मुन्नासेठ,शेख मन्सुर,शेख मोहसिन,शेख उस्मान, खालेक कुरेशी,रईस भाई, तारेक हरबट सह शेकडो हिंदू मुस्लिम बांधवा उपस्थित होते. यावेळी सकल मराठा बांधवांचे मुस्लिम बांधवांनी आभार व्यक्त केले.
Back to top button