📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

रक्ताचा पुरवठा भासवू लागल्याने तरुणांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे  

रक्ताचा पुरवठा भासवू लागल्याने तरुणांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे

सिटी ब्लड बँकेचे रविकिरण गिरी (गोसावी) यांचे भावनिक आवाहन

बीड (प्रतिनिधी): रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, आपल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतात. हीच सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन बीड शहरातील नागरिकांनी आणि तरुणांनी आगामी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे भावनिक आवाहन सिटी ब्लड बँकेचे संचालक रविकिरण गिरी (गोसावी) यांनी केले आहे.
सध्याच्या काळात विविध वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी रक्ताची मोठी गरज भासते. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि वेळेवर रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने तरुणांनी वाढदिवसांवर होणारा खर्च टाळून रक्तदान शिबीरे आयोजित करुन युवक-युवतींना यात सक्रीय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, सामाजिक संस्था, गावातील अखंड हरिनाम सप्ताह, समाजोपयोगी कार्यक्रमातून रक्तदान शिबीरे घ्यावीत. जेणे करुन रक्ताचा तुटवडा भासणार नाही. दुष्काळी परिस्थितीत सध्या रक्ताचा तुटवडा भासत असून अपघातातील रुग्णांना, प्रसुती, थॅलेसिमीया, अ‍ॅनेमिया, सिकलसेल, पेशींची कमी असणार्‍या रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी रक्तदान शिबीरे घ्यावीत असे आवाहन सिटी ब्लड बँकेचे संचालक रविकिरण गिरी (गोसावी) यांनी केले आहे. तसेच गाव स्थरावरील नागरीकांनी तसेच बीड शहरातील नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावयाचे असल्याचे सिटी ब्लड बँक, ताज प्लाझा, फिनिक्स हॉस्पिटलचा तळ मजला जालना रोड बीड येथे संपर्क साधावा. अथवा भ्र.8237770089, 9921270931 यांच्या संपर्क साधून माहिती घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आह.

Back to top button