📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

इंटर्नशिप भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना मिळाला मोठा आधार

इंटर्नशिप भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना मिळाला मोठा आधार

महाराष्ट्र व्हेटर्नरी स्टुडंट्स असोसिएशनने मानले ना. पंकजाताई मुंडे यांचे आभार

मुंबई दि. १८ —-
पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र व्हेटर्नरी स्टुडंट्स असोसिएशन या विद्यार्थी संघटनेने राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची आज भेट घेऊन आभार मानले. ना. पंकजाताईंच्या या निर्णयामुळे राज्यातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना फार मोठा आर्थिक आधार मिळाला असल्याची प्रतिक्रिया असोसिएशनने यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या आंतर्वासिता निर्वाह भत्यात सात हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्या अगोदर महाराष्ट्र व्हेटर्नरी स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात ना. पंकजाताई मुंडे यांची मंत्रालयात भेट घेऊन इंटर्नशिप भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन ना. पंकजाताईंनी हा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता.

ना. पंकजाताईंमुळे मिळाला न्याय
——–
इंटर्नशिप भत्त्यात वाढ करावी अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही करत होतो पण  ना.पंकजाताई मुंडे यांच्या एका निर्णयामुळे आम्हाला न्याय मिळाला अशी भावना स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश रत्नपारखी यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप भत्ता अकरा हजार रुपये दिला जात होता पण आता या निर्णयामुळे त्यांना दरमहा अठरा हजार रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे. यामुळे आनंदित झालेल्या राज्यातील विविध पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थी व विद्यार्थीनीच्या शिष्टमंडळाने आज ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

यावेळी स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष रत्नपारखी यांच्यासह प्रणव पाटील, सुहाना रैना, प्रतिक सुवर्णकार, पवन राठोड, शिवरत्न वायकर, विशाल निंगोरे, वैष्णवी घुगे, जान्हवी ढोले, मैथिली गायकवाड, पुष्कर आनंदगावकर, शुभम वाडेकर, माधवी झेपाडे, दक्षिता नगिने आदी विद्यार्थी उपस्थित होते.
••••

Back to top button