📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मानमोडी जोडरस्त्याच्या सुधारणेच्या कामाचा शुभारंभ; ४९ लाखांचा निधी मंजूर

मानमोडी जोडरस्त्याच्या सुधारणेच्या कामाचा शुभारंभ; ४९ लाखांचा निधी मंजूर
ग्रामविकासाला प्राधान्य, शिवछत्र परिवार ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार
गेवराई (प्रतिनिधी) : मौजे मानमोडी, ता. गेवराई येथे दि.18 बुधवार रोजी जोडरस्त्याच्या सुधारणेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी सुमारे ४९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, परिसरातील नागरिकांची रस्त्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनातून आणि आमदार श्री. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.
शुभारंभ कार्यक्रमास मानमोडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत गावाच्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवछत्र परिवार सदैव कटिबद्ध असून, गावातील प्रत्येक विकासकामासाठी ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही देण्यात आली.
Back to top button