बीड
मुस्लिम संरक्षण कायदा मागणीची मशाल बीडला पेटली आता राज्यात व दिल्लीपर्यंत पेटवणार अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र निमंत्रक ॲड. प्रा. इलियास इनामदार

मुस्लिम संरक्षण कायदा मागणीची मशाल बीडला पेटली आता राज्यात व दिल्लीपर्यंत पेटवणार अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र निमंत्रक ॲड. प्रा. इलियास इनामदार
बीड प्रतिनिधि: अल्पसंख्याक समाजावर होणा-या अन्याय अत्याचार, मॉबलिचींग, हेटस्पिच, दंगली व अल्पसंख्याक मुस्लिम समाजाप्रती संवैधानिक पदावर बसुन बेताल वक्तव्य करणा-या नेत्यांविरोधात कडक कार्यवाही करावी.
अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे संरक्षण करण्यासाठी जसे अनुसुचित जाती जमातीचे ॲटरासिटी ॲक्टद्वारे संरक्षण होते त्याच पध्दतीचे अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवून समाजाला सुरक्षा दयावी यासाठी महाराष्ट्र स्वतंत्रदिनी एक मे ला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी साडे दहा वाजल्या पासुन सायंकाळी चार वाजेपर्यंत एकदिवसीय लक्षणिक आंदोलन झाले आहे. मुस्लिम संरक्षण कायदा मागणीची मशाल बीडला पेटली आता राज्यात व दिल्लीपर्यंत पेटवणार अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र निमंत्रक ॲड. प्रा. इलियास इनामदार व सर्व सदस्यांनी केली आहे. हे आंदोलन मुज्तबा अहमद खान सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
शासनाला अशी मागणी केली की अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायदयामध्ये या तरतुदी करण्यात यावे जसे मॉबलिचींग असो की जातीय दंगली अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती मारला गेला तर त्याच्या पिडीत परिवाराला पन्नास लाखाची आर्थिक मदत मिळावी एखादयास अपंगत्व आल्यास त्याला पंचेवीस लाख रु. आर्थिक मदत मिळावी व पिडीतग्रस्त व्यक्तीच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकिय नौकरी मिळावी सोबतच एखादया समाजाविरोधात जाणुन बुजुन हेटस्पिच असंवैधानिक वक्तव्य केल्यास त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करुन जेरबंद करावे राष्ट्रपुरुष असो, स्वतंत्रता सेनानी असो अथवा संत नबी स. असो यांची विठंबना-बेउरमती करणा-या हरामखोरांवर कडक कार्यवाही व्हावी, कायदयापुढे सर्व समान मग न्यायव्यवस्था असताना जातीयद्ववेष ठेवून बुलडोजर कार्यवाही का? असे होता कामा नये
या आंदोलनाला सर्वच राजकिय सामाजिक शिक्षक विदयार्थी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला धार्मिक गुरु यांनी दुवा देवून साथ देण्याचे आश्वासन दिले आहे. या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे हिन्दू बांधव समर्थन व पाठिंबा देण्यास बहुसंख्येने उपस्थित होते व शेवट पर्यंत तुमच्या सोबत आहोत असे अश्वासन दिले या आंदोलनाद्वारे केंद्र व राज्य शासनाला एक महिन्याचे अल्टीमेटम दिले गेले आहे.
शासनाने आमच्या मागणीची दखल घ्यावी नसता बेमुदत उपोषणाला बसणार अशी माहिती अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने ॲड. प्रा. इलियास इनामदार मुजतबा अहमद खान शेख मुसा सर ॲड. मोमीन अखील ॲड. शेख जेबा,ॲड. जावेद मणियार खदीर शेख अखिल अन्ना हमिद पालेखान शेख ऐतेशाम शेख मैनूद्दीन सलीम खान डॉ. शेख मोहसिन आबेद कादरी सय्यद नबीलुज्जमा पठाण खदीरुज्जमा मुशीर इनामदार पठाण अमरजान शामीर खान इमरान इनामदार शेख खदीर गुड्डू चाऊस हाफिज मोहम्मद अर्सलान शेख नदीम अकबर अतार यांनी जनतेच्या साक्षीने शासनाला इशारा दिला आहे.
या आंदोलनामध्ये आवर्जून उपस्थित असलेले कॉंग्रेसचे राष्ट्रीयनेते मा. आ. सिराज देशमुख, मा. आ. उषाताई दराळे, आमचे जेष्टनेते मार्गदर्शक आदरणीय मोईन मास्टर साहेब, नगराध्यक्ष प्रतिनिधि शेख मुजीब, गटनेते आमचे सहकारी फारुक पटेल, एमआयएम जिल्हाध्यक्ष आमचे मित्र ॲड. शफीक भाऊ, गटनेते आमचे सहकारी खुर्शीद आलम. सभापती निजाम सरकार मुफ्ती अब्दुल्ला कासमी मौलाना साबीर सहाब मौलाना जफर काजी मौलाना मोईन साहेब नितीन जायभाये, ॲड. पुरुषोत्तम वीर, राजकुमार घायाळ, प्राचार्य डी जी तांदळे सर, डॉ.शशीकांत गायकवाड़, किसकिंदा ताई पांचाळ, गणेश पांचाळ गोरख थोरात बाळासाहेब पाटील सिताताई भोसले अशोक येडे बाजीराव ढाकणे अरफात खान शेरजमा पठाण बाबा मेंबर इलियास टेलर शाहेद कादरी शकील खान शेख मोसीन कॉंग्रेस खमर भाई समीर सरकार शाहनवाज खान सय्यद सलमान शेख वजीर ॲड सय्यद खाजा मुजीब काजी मतीन भैय्या गणेश राऊत समीर बेग फारुक मणियार रेहाना बाजी शाकेरा बाजी सालेहा बाजी शाजीया बाजी मुस्तफा पठाण जाकेर नजीर ॲड यासेर पटेल जकी सौदागर सय्यद साजेद मुबीन डॉ. इद्रीस हाशमी गुलाम साकिब व नोंद वहीवर सात आठ शे नाव आहे सर्वांचे नाव बातमी मध्ये घेणे शक्य नसल्याने आम्ही खेद व्यक्त करतो व या महिन्याच्या शेवटी एक व्यापक बैठक घेवून बेमुदत उपोषणाला बसणार आहे असे अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.



