बीड

ना. पंकजाताई मुंडे यांनी कवडगाव येथे जाऊन डाॅ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाची घेतली भेट

ना. पंकजाताई मुंडे यांनी कवडगाव येथे जाऊन डाॅ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाची घेतली भेट

*आई-वडिलांना दिला आधार; मी तुमच्या पाठिशी खंबीर, डाॅ. संपदाला न्याय मिळवून देऊ*

बीड।दिनांक २५।
सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डाॅ. संपदा मुंडे यांचा मृत्यू अतिशय वेदनादायी आहे, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, डाॅ संपदाला न्याय मिळवून देऊ अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी डाॅ संपदाच्या आई-वडिलांचे सांत्वन करत धीर दिला.

डाॅ. संपदा मुंडे हया वडवणी तालुक्यातील कवडगावच्या रहिवासी असून सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपले आयुष्य संपवले. आज त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ना. पंकजाताई मुंडे आज जालन्याहून तातडीने कवडगावात आल्या.  डाॅ संपदा यांच्या शोकाकुल परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी तुमच्या पाठिशी आहे, काळजी करू नका, डाॅ संपदाला न्याय मिळवून देऊ, मी मुख्यमंत्र्यांना याविषयी बोलले आहे अशा शब्दांत ना. पंकजाताईंनी त्यांच्या आई वडिलांना धीर दिला.

Back to top button