📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेडमध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्सची जनजागृती रॅली

जामखेडमध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्सची जनजागृती रॅली

जामखेड : “तुमचा वैद्यकीय खर्च आम्ही करणार” या घोषवाक्याने जामखेड शहरात स्टार हेल्थ इन्शुरन्सचे विक्री अधिकारी संतोष डहाळे व प्रतिनिधींच्या वतीने आरोग्य विमा जनजागृती रॅली काढण्यात आली. तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने करण्यात आले.

“हर घर तिरंगा – हर घर स्टार हेल्थ इन्शुरन्स” या घोषवाक्याने मोटरसायकल रॅली काढत घरोघरी नागरिकांना भेट देऊन आरोग्य विम्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सध्याच्या वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य विमा किती आवश्यक आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी अरुण उगले, विनायक राऊत, विजय गर्जे, जयसिंग पवार, संतोष जगताप,किशोर हुंबे, सौरभ पवार, विजय कोकाटे, संदीप भालेराव, खटावकर सर, महेश आजबे, नितीन मैड, इमरान पठाण, गुरुदेव, संतोष घोलप, विठ्ठल नेटके आदींसह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

Back to top button