बीड
नगरपालिका आणि वाहतुक शाखेच्या माध्यमातून शहरातील अतिक्रमण धारकांवर कार्यवाही

बीड (प्रतिनिधी) या अगोदर फेबु्रवारी महिन्यात शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना तसेच हातगाड्यांवाल्यांना सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यास काय होते याचा एकवेळ दणका दिल्यानंतरही शहरातील व्यापारी काही सुधरण्याचे नाव घेत नसून पुन्हा मुख्यरस्त्यावर हातगाडे, ओटे, पत्र्याचे शेड दिसू लागल्याने काल दि.28 जून रोजी नगरपालिका आणि वाहतुक शाखेच्या माध्यमातून शहरातील अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करण्यात आली.
सार्वजनिक रस्ते हे सरकारची मालमत्ता आहे ही बाब माहिती असतांना व्यापार्यांकडून नियमांचे उल्लंघन करुन बीड शहरातील बस स्टॅण्ड, साठे चौक, डीपी रोड, अंबिका चौक, राजीव गांधी चौक आदी मुख्य रोडवरील दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, गाड्यावाले, टपर्यावाले सर्वांचे अतिक्रमण होवू लागले त्यामुळे नगरपालिका आणि वाहतुक शाखेने अतिक्रमण काढून रस्त्यांना मोकळा श्वास घेवू दिला त्यामुळे बीड शहरातील रस्ते मोठे वाटू लागले आणि वाहने व नागरिकांना जाण्यासाठी रस्ता सुलभ झाला होता. यावेळी एपीआय सानप साहेब, पीएसआय जाधवर साहेब, राजाभाऊ तांदळे, चिंतामणी शिंदे, अजिनाथ मुंडे, विश्वजीत वाघमारे, सिध्दार्थ गोरे, संतोष हरके, मुन्ना गायकवाड, पवन लाहोट ,सुजीत जाधव, वीकी डागट, शरद खुपशे, राम रोकडे, किरण भिसे व इतर कर्मचारी उपस्थित होते.