वडाळा महादेव येथे होणार संत ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलन-बाबासाहेब पवार (प्रसिद्ध गीतकार)

वडाळा महादेव येथे होणार संत ज्ञानेश्वर महाराज साहित्य संमेलन-बाबासाहेब पवार (प्रसिद्ध गीतकार)
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना-लोककला, कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलन श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे दिनांक एक जून रोजी डॉक्टर बाबुराव उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उक्कडगाव येथील ह भ प बाबा महाराज ससाणे यांच्या शुभहस्ते होणार असून ज्येष्ठ कवी राजेंद्र फंड या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष पद भूषवणार आहेत. अशी माहिती त्या संमेलनाची संयोजक सुप्रसिद्ध गीतकार बाबासाहेब पवार यांनी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत श्री वासुदेव काळे, सुभाष त्रिभुवन , सायमन भारस्कर, अविनाश आपटे, यांच्यासह दत्त भाऊ खेमनार, अरविंद शेलार, सोमनाथ महाले , विकास अनत्रे, आदिनाथ जोशी, प्रदीप वाघ, संपादक करण नवले, प्रकाश कुलथे, भाऊसाहेब भोडगे, चंद्रकलाबाई पवार, धनंजय पवार रामभाऊ कसार अविनाश पवार कैलास पवार सुनील कुदळे रघुनाथ उघडे राम गायकवाड दादासाहेब झिंज भरत पवार अनिरुद्ध महाले कृष्णा पवार मोहनी राज होन, सचिन पवार, प्राध्यापक टी ई शेळके राजेंद्र पोतदार ह भ प पाडागळे महाराज शिवाजीराव बारगळ पोपटराव पटारे यांच्यासह इतर मान्यवर हजर राहणार आहेत.
या साहित्य संमेलनामध्ये सर्व साहित्य प्रेमींसाठी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये परिसंवाद, भारुड तसेच प्रसिद्ध शाहीर भारत गाडेकर यांचा शाहिरी जलसा गाजणार आहे. महाराष्ट्रातील सांप्रदायिक गवळणी आणि अभंग यांचेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारच्या सत्रामध्ये निमंत्रिताचे कवी संमेलन होणार आहे. त्यामध्ये प्रथम सत्राचे कवी संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य बाळासाहेब कोठुळे हे भूषवणार आहेत तर द्वितीय सत्र मध्ये ग्रामीण साहित्यिक कवी गोरखनाथ पवार हे अध्यक्ष पद भूषवणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी व कवयित्री सहभागी होणार आहेत. तसेच यावेळी प्रसिद्ध चित्रकार सुभाष चारुडे यांचे चित्रांचे प्रदर्शन पाहावयास मिळणार कवी बाबासाहेब पवार यांच्या ती व मी या चारोळी संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संदीप कासार सर करणार आहेत. दुपारी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.
वडाळा महादेव येथील त्रिंबकेश्वर सभागृह या ठिकाणी या कार्यक्रमाची आयोजन केले आहे सर्व मराठी साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमासाठी हजर राहण्याची आव्हान लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य व बहुजन समाज संघटना वडाळा महादेव यांनी केले आहे.



