📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
रत्नागिरी

कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 97.62 टक्के

कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता
12 वी विज्ञान शाखेचा 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 97.62 टक्के

मंडणगड – (प्रतिनिधी) दि. : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रु-मार्च – 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी वाणिज्य व विज्ञान परीक्षेमध्ये येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालयातील प्रविष्ठ नियमित विध्यार्थ्याच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा 97 .62 टक्के लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेतून बामणे नेहा संजय हिने – 64 .50 टक्के तसेच व्दितीय क्रमांक मोडकले श्रद्धा राजनाथ हिने 58 .83 टक्के तर नलावडे रोहण ईश्वर याने 57 .50 टक्के गुण मिळवून तृतीय येण्याचा मान मिळविला. तर इयत्ता 12 वी वाणिज्य शाखेतून यादव मेघना प्रवीण हिने – 78 .33 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच व्दितीय क्रमांक दिवेकर सिद्धी राजेश हिने- 77 .00 टक्के तर कदम अनिशा अविनाश हिने 76 .83 टक्के गुण मिळवून तृतीय येण्याचा मान मिळविला.
महाविद्यालयामधून वाणिज्य शाखेतून एकूण 42 नियमित विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी विशेष प्राविण्य 03, प्रथम श्रेणीमध्ये 04, व्दितीय श्रेणीमध्ये 24 विद्यार्थी, तृतीय श्रेणीमध्ये 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विज्ञान शाखेतून एकूण 21 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी प्रथम श्रेणीमध्ये 01 विद्यार्थी, व्दितीय श्रेणीमध्ये 12 विद्यार्थी तर तृतीय श्रेणीमध्ये 08 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विध्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, कार्यवाह प्रा. सतिश शेठ तसेच सर्व संस्थापदाधिकारी, स्थानिक संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Back to top button