बीड

आरोग्य धोक्यात ; जामखेड नगरपरिषदेकडून फवारणी नसल्याने डासांचा त्रास वाढला

आरोग्य धोक्यात ; जामखेड नगरपरिषदेकडून फवारणी नसल्याने डासांचा त्रास वाढला

जामखेड प्रतिनिधी:-जामखेड शहरात अनेक महिन्यापासून फवारणी नसल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक त्रस्त झाली आहेत नगरपरिषद प्रशासन नेमकं आहे कुठे असा जाहीर सवाल नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. मे महिन्या नंतर पाऊस थांबल्याने अचानक गर्मी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जामखेड नगर परिषदेने दरवर्षी केली जाणारी मान्सून पूर्व नदी, नाले सफाई कुठलेच नियोजन नसून, जामखेड शहरात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डास व माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यात अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यामुळे जामखेड शहरावर संकट ओढले आहे. रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने डासांचे पैदास वाढले आहे यावर प्रतिबंध करण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेने मागील अनेक महिन्यांपासून शहरात फवारणीच न केल्याने तपनेश्वर, बाजारतळ, सदाफुले वस्ती, मोरे वस्ती, छत्रपती शिवाजीनगर, संताजी नगर, भाजी मंडई, नुराणी कॉलनी, आदर्श कॉलनी तसेच विविध भागात मोठ्या प्रमाणावर डास वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जामखेड शहरात मान्सून पूर्व नदी व नाले सफाई नियोजन त्वरित करण्यात यावी अशी नागरिक मागणी करत आहे.

*चौकट*
शहरातील विविध भागांमध्ये नालेसफाई न झाल्यामुळे डासांच्या पैदाशीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू असताना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचा धोका वाढत चालला आहे. रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.आरोग्य विभाग व नगरपरिषदेने तत्काळ लक्ष घालून नियमित फवारणी करणे गरजेचे आहे.

Back to top button