प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरजू लाभार्थीना सेल्फ किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व्हे पूर्ण करून घेण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन

परळी तालुक्यात ३१६४ सर्व्हे सह पूर्ण; २६३४ सेल्फ तर ४९९ सर्व्हे ग्रामसेवकांच्या मार्फत पूर्ण
३० एप्रिल आधी सर्व्हे पूर्ण करण्याचे आवाहन; कागद पत्रांची पूर्तता करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करणार मदत
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा स्वतःच्या माध्यमातून सर्वे करण्याचे काम सुरू असून याची मुदत येते 30 एप्रिल रोजी संपणार असल्याने गरजू व पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी स्वतः ॲपवरून किंवा ग्रामसेवकाच्या मार्फत आपला सर्वे पूर्ण करून घ्यावा असे आवाहन माजी मंत्री तसा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे.
परळी तालुक्यात आतापर्यंत 3164 लाभार्थींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी 2634 सर्व्हे हे नागरिकांनी स्वतः पूर्ण केले असून 499 सर्वे हे ग्रामसेवकांच्या मार्फत पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी दिली आहे.
दरम्यान येत्या 30 एप्रिल रोजी सर्वे पूर्ण करण्याची मुदत संपणार असून त्याआधी पात्र असलेल्या गरजू नागरिकांनी आपल्या घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे. कागद पत्रांची किंवा त्रुटींची पूर्तता करण्यासाठी परळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मदत करणार असून कुणाला मदतीची आवश्यकता असल्यास त्यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके यांना संपर्क करावा असे आवाहनही धनंजय मुंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
याआधीही धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगर परिषदेने रमाई आवास सह विविध योजनेतून विक्रमी घरकुले मंजूर करून दिलेली आहेत.


