
शनिवार दि.15 रोजी कृषी पंडित भागूजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोर उभारण्यात आलेल्या या चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. संभाजी महाराज,ओंकार महाराज वाघमारे आणि राम महाराज शास्त्री यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते रोहित क्षीरसागर होते. यावेळी अरुण बोंगाणे, विवेक मुंडे,श्रीकांत मिसाळ,योगेश पवार, रितेश साबळे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना महामार्गालगत चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज बनली आहे.याच उद्देशाने पाडळसिंगी येथे हे फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासोबतच पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे आगामी काळात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात विवेक मुंडे, विकास चौधरी, अरुण बोंगाणे, योगेश पवार, ओंकार महाराज, राम महाराज शास्त्री आणि संभाजी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीराम जाधव यांनी केले,तर प्रास्ताविक परमेश्वर धारकर यांनी केले.
कार्यक्रमास संदीप नन्नवरे, दत्ता तिपाले, बळीराम साबळे, पुरुषोत्तम दाभाडे, राजेश क्षीरसागर, राम भांडवलकर, दिनेश साठे, रघुनाथ दाभाडे, पांडुरंग शिंदे, सिकंदर घोडके, लक्ष्मण दाभाडे, गणेश राऊत, गिण्यानदेव चौधरी, शेख आयुब, राजू पटेल, अण्णासाहेब थिटे, राजेंद्र कुरे, अभिषेक राऊत, रियाज बेग, राजेंद्र सोनवणे, राजेंद्र रांजवण, रमेश टाखाणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी कैलास टोंपे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



