बीड

गुरुंच्या प्रेरणेने शिंगवी परिवाराची चार दशकांची लोकसेवा – आ. रोहित पवारांचा गौरवोद्गार

गुरुंच्या प्रेरणेने शिंगवी परिवाराची चार दशकांची लोकसेवा – आ. रोहित पवारांचा गौरवोद्गार

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी – गुरुंची प्रेरणा घेऊन गेली चार दशके लोकसेवा अखंड सुरू ठेवणे हे मोठे कार्य आहे. शिबिरांचे आयोजन सोपे नसते; अनेक अडचणींवर मात करत ही सेवा शिंगवी परिवार करीत आहे. लोकांवरील प्रेम आणि गुरुंच्या प्रती आस्था यामुळेच त्यांच्या हातून अशी चांगली सेवा घडते. अशोक शिंगवी आणि अभय शिंगवी यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे मी अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार आमदार रोहित पवार यांनी काढले.
स्व.सुंदरबाई कन्हैयालाल शिंगवी सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या प्रेरणेने व परमपूज्य आदर्श ऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने शिंगवी चष्माघर व आनंद ऋषीजी नेत्रालय अहिल्यानगर,संयुक्त विद्यमाने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

या शिबिराचे उद्घाटन दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंगवी, सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी, राष्ट्रवादी पार्टीचे जेष्ठ नेते वैजिनाथ पोले,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले,अशोक कानडे, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, जेष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे,नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक बिभिषण धनवडे,युवा नेते संदीप अण्णा गायकवाड, प्रविण उगले, अनिल रेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबीरामध्ये १०८ रूग्णांची तपासणी करून ६३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत

Back to top button