स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीचे शिष्टमंडळ खासदार, जिल्हाधिकारी यांना भेटणार

शिष्टमंडळ खासदार, जिल्हाधिकारी यांना भेटणार
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन नियोजीत लोहमार्गाच्या कामाच्या अडथळे निवारणासाठी देणार निवेदन
बीड:अहिल्यानगर- बीड – परळी वैद्यनाथ या मार्गातील कामांमध्ये जे काही अडथळे आहेत त्या अडथळ्याची माहिती घेऊन त्याच्या संदर्भात नियोजन करण्यात याचा विचार प्रशासन पातळीवर करावा. संभाजीनगर – बीड- धाराशिव तसेच अहमदनगर बीड परळी या दोन मार्ग सोबत सविस्तर चर्चा होऊन दोन निवेदन तयार करून तिन्ही जिल्ह्याचे खासदार तसेच बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन तयार करून स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीचे शिष्टमंडळ खासदार, जिल्हाधिकारी यांना भेटणार असल्याचे समितीच्या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समिती जिल्हा बीड ची बुधवारी ( दि. २५ ) समितीची बैठक ज्येष्ठ सदस्य अरुणराव नारायण डाके यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. समितीचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सचिव सुनील क्षीरसागर, शांतीलाल पटेल, विष्णुदास बियाणी, रामचंद्र जोशी, अशोक म. शेटे, शिवाजी बन्सी जाधव, सय्यद नवीदुजम्मा, रवी उबाळे, अरुण बाबासाहेब डाके, महम्मद लईक अहेमद, भास्करराव जाधव, तुकाराम साळुंके, विलासराव बडगे, वाय जनार्दन राव, सखाराम मस्के, वैभव स्वामी आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये अहिल्यानगर – बीड – परळी वैद्यनाथ या लोहमार्गाच्या विकास कामांवर चर्चा करण्यात आली. तसेच चालू असलेल्या अडीअडचणी संदर्भात विचार विनिमय करण्यात आली. या बैठकीमध्ये सध्या चालू असलेल्या कामांमध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत त्याबद्दल चर्चा करण्यात आली, यासंदर्भात लवकरच माहिती घेऊन जिल्हाधिकारी यांना नियोजन देण्यात येणार असल्याचे ठरले. यासोबत धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गासाठी कृती समितीने प्रयत्न करणे यासह सविस्तर माहिती घेऊन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या समवेत विस्तारीत बैठकीचे नियोजन केले जाणार आहे. तसेच धाराशिव आणि संभाजीनगर येथील खासदार यांना निवेदन देण्याचे संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यासंदर्भात एक सर्व व्यापक बैठक घेऊन या मार्गासाठी या मार्गाची मागणी तीव्र स्वरूपात करण्याचा विचारविनिमय ठरवण्यात आले. या बैठकीमध्ये धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर च्या संदर्भात तसेच अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामासंदर्भात माहिती घेऊन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत रेल्वे मंत्रालयांना निवेदन देण्यासंदर्भात साधक बातम्या चर्चा करण्यात आली.
—–
४४ वर्षांचा समितीचा लढा
१९८२ मध्ये अहिल्यानगर -बीड- परळी वैद्यनाथ लोहमार्गाच्या मागणीसाठी कॉ. अतहर बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. १९८३ दरम्यान तत्कालीन खा. केशर काकू क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली समितीचे शिष्टमंडळ दिल्लीला पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती ग्यानी झैलसींग, केंद्रीय रेल्वेमंत्री गनीखान चौधरी यांना भेटीस गेले. पुढे समितीने स्वातंत्र्य सैनिक मदनलाल सारडा, देशभूषण जैन, स्वातंत्र्य सैनिक बन्सीधर जाधव यांच्या अध्यक्षपदच्या कार्यकाळात आणि निमंत्रक संपादक नामदेव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तिव्र झाले. आता समितीचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा यांनी अहिल्यानगर -बीड- परळी वैद्यनाथ कामे गतीने होण्यासाठी आणि धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर या नवीन लोहमार्ग ची मागणी उचलून धरली आहे. एकूणच बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण दोन्ही लोहमार्ग आवश्यक असल्याचे समितीचे सचिव सुनील क्षीरसागर यांनी सांगितले.
——
बीडमधून मुंबई अशी रेल्वे खात्याची रेल्वे चालू होईल
१९८२ ला स्वातंत्र्यसैनिक मदनलाल सारडा यांनी स्वातंत्र्य रेल्वे स्वातंत्र सैनिक रेल्वे आंदोलन समितीची स्थापना केली त्यामध्ये सचिव म्हणून देश भूषण जैन, स्वतंत्र सैनिक बन्सीधर जाधव, निमंत्रक संपादक नामदेव क्षीरसागर, आणि त्यात २५ जनासह इतर स्वातंत्र सैनिक सहभागी झालेले होते. या लोकांनी रेल्वे परळी बीड अहिल्या नगर साठी दिल्लीला जाऊन त्यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली तसेच त्यांनी रेल्वेच्या बाबतीत दोन वेळेला दिल्लीला भेट दिली. रेल्वे मंत्र्यांचे भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन काम लवकरात लवकर कसे होईल याची यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होत. त्यानंतर बजेटमध्ये रेल्वेमंत्र्यांनी बीड परळी अहिल्यानगर साठी बजेट ची तरतूद केली. यासाठी तत्कालीन पालकमंत्री विमल मुंदडा यांनी विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री म्हणून रेल्वे साठी लागणारा अर्धा खर्च महाराष्ट्र शासन करण्यास तयार आहे, असे पत्र केंद्र शासनाला दिले तेथून पुढे खरी गती कामाची सुरू झाली. २०१४ मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला २८०० कोटी रुपयांची तरतूद एक मस्त मंजूर केली म्हणून कामाला गती आली व आज बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे दररोज चालू लागली पुढे ऑगस्ट १५ ऑगस्ट पर्यंत बीड मुंबई अशी रेल्वे खात्याची रेल्वे चालू करण्याची नियोजन आहे म्हणजे बीड करांची स्वप्न साकार होईल व स्वातंत्र्यसैनिकांनी जो लढा दिला त्याला खरं श्रेय देता येईल, असे ही समितीचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा यांनी सांगितले.



