बीड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पेठ बीड समिती,मंडप संघटनेच्या वतीने आयोजित अल्पोपहार व पाणी स्टॉलला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, आरपीआयचे पप्पूजी कागदे, डॉ. योगेश क्षीरसागर,  हेमंत क्षीरसागरांसह विविध मान्यवरांच्या भेटी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पेठ बीड समिती,मंडप संघटनेच्या वतीने आयोजित अल्पोपहार व पाणी स्टॉलला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, आरपीआयचे पप्पूजी कागदे, डॉ. योगेश क्षीरसागर,  हेमंत क्षीरसागरांसह विविध मान्यवरांच्या भेटी 
बीड दि.१५(प्रतिनिधी):- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पेठ बीड कृती विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अमृत काका सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवानिमित्त सोमवार दि.१४ एप्रिल २०२५ रोजी भल्या पहाटे पासून पेठ भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवर मंडळीसह माता, भगिनी, यूवा, पुरुष भिमसैनीकांसाठी अल्पोपहार व शुद्ध पाणी जारची सोय करण्यात आली होती.
यावेळी पेठ बीड कृती समितीच्या अल्पोपहार स्टॉलला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, आरपीआय आठवले गटाचे पप्पूजी कागदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, ज्येष्ठ नगरसेवक विष्णू भैया वाघमारे, राणा चौव्हाण, गणेश वाघमारे, वंचितचे अशोकराव हिंगे, भाजपाचे अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, आसारामभाऊ गायकवाड, डेमोक्रॅटिक पक्षाचे अजिंक्य चांदणे, बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके, आरपीआयचे जिल्हा सचिव राजू जोगदंड, महेश धांडे, अनिल चांदणे, राजू महूवाले, नितीन धांडे, जलीलखान पठाण, जि प सदस्य महादेव मुंडे, संगीता वडमारे, ॳॅड. हेमा पिंपळे, कल्याण ताकतोडे, माजी न. प. सदस्य रामसिंग टाक, अमोल पौळ, अरुण सवई, पुरुषोत्तम वीर, अविनाश जोगदंड, संजय महाद्वार, भागवत बादाडे, दादा हातागळे, कल्याण ताकतोडे, अनिल चांदणे, बंडू निसर्गन, सचिन चव्हाण, संपादक गंगाधर काळकुटे, गोडसे, थोटे, शेखर महाद्वार, भरत चुंगडे, स्वप्निल हातांगळे, परशुराम गायकवाड  आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल पेठ बीड कृती समितीचे कौतुक केले.
याप्रसंगी अब्बुभाई गादी घरवाले, विजय पिव्हाळ, सतपाल लाहोट, सुरेश जगताप, नंदकुमार येवले, लक्ष्मण शेनकुडे, जयंत राऊत, रुस्तुम बेद्रे, रणजित शिनगारे, सोनू पांडे, गौतम कांबळे, उत्तम कांबळे, राम इगडे, प्रभाकर शिंदे, अनिल मुसळे, संजय राजहंस, गणेश पाचेगावकर, दिलीप खंदारे, विजय जोगदंड , विशाल मोरे, प्रेम चांदणे, विलास बामणे, प्रभू चांदणे, राम कदम, अशोक घोडके, सोमनाथ राऊत, बाला कपाळे भागचंद परदेशी, बाला घोडके, लक्ष्मण इगडे आदींसह पेठ बीड शहर कृती विकास समिती, मंडप संघटनेचे सदस्य, पदाधिकारी, परिसरातील व्यापारी नागरिकांनी मोठे सहकार्य केले.
Back to top button