बीड
उद्धवा सारखा तालुकाप्रमुख तालुक्याची शिवसेना पुढे घेवून जात आहे :-जिल्हा संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे

उद्धवा सारखा तालुकाप्रमुख तालुक्याची शिवसेना पुढे घेवून जात आहे :-जिल्हा संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे
*स्थानिकच्या युतीतील नेत्यांमुळे कामे आडतात :- तालुकाप्रमुख उध्दव मडके*
*गेवराई शहरात वाटप झालेले पिटीआर एकनाथ शिंदे साहेबांच्या कृपेमुळे:- स्वप्निल गलधर*
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या निमित्ताने गेवराई विधानसभा आढावा बैठक संपन्न*
गेवराई (प्रतिनिधी):-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने गेवराई येथिल शिवसेना संपर्क कार्यालयात दि २० रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
याबैकीस संपर्क प्रमुख बापुसाहेब मोरे यांच्यासह जिल्हाप्रमुख सचिन मुळुक जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर, युवा सेना जिल्हाप्रमुख रविराज बडे सह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने गेवराई विधानसभा मतदार संघातील शिवसैनिका सह सर्वसामान्यला होत असलेल्या कामे,पक्ष वाढीसाठी तसेच सदस्य नोंदणी बाबतीतआढावा बैठकीत चर्चा झाली बैठकी दरम्यान
शिवसेनेत युवकांनी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केले.
दरम्यान बीड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणाले शिवसेनेचे विचार तळागळा पर्यंत पोचवले पाहिजे आपण आपली जवाबदारी योग्य पार पाडा घर तिथे भगवा झेंडा गाव तिथे शाखा ज्यांना ज्यांना आपल्या कडे आणता येईल त्यांना आणा शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे एकच स्वप्न आहे शिवसैनिक मोठा झाला पाहिजे पुढे बोलताना त्यांनी स्व. अमोल भैय्या गलधर यांच्या आठवणीला उजाळा दिला स्व. अमोल भैय्या गलधर यांचे स्वप्न स्वप्निल गलधर पुर्ण करत आहेत जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर हे बीड जिल्हात शिवसेनेची ताकद वाढवत आहेत युवकांची त्यांनी मोठी फळी निर्माण केली पुढे बोलताना उद्धवा सारखा तालुकाप्रमुख तालुक्याची शिवसेना पुढे घेवून जात असुन उध्दव मडके यांनी सर्वांचे संघटन करत तालुक्याच्या शिवसेनेत नवचेतना भरली
असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गेवराई तालुक्यातील महाराणा ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष गजानन पांडे, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ तलवाडे, शिवसेना उबाठा ता समन्वयक अभिषेक शिंदे, परशुराम बने,वैजिनाथ बोराडे, गणेश डेंगळे, बाळासाहेब चव्हाण, दत्ता चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण सुनील चव्हाण, रामेश्वर चव्हाण, नकुल अतकर, मनोज अतकर यांच्या सह असंख्य युवकांना शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना गेवराई तालुकाप्रमुख उध्दव मडके यांनी युतीतील पक्ष व स्थानिक प्रस्थापित नेत्याकडून कामे आडवूनक होत असल्याचे सांगितले .
पुढे बोलताना मडके यांनी सांगितले की स्थानिक प्रस्थापित नेते आमचे कामे आडवतात शासकीय कार्यालयात त्यांनी नागोबा बसवले आहेत त्यांच्यामुळे आमचे कामे होत नाहीत आपण सत्तेत असताना देखील शिवसैनिकांसह सर्वसामान्याला याचा फायदा होत नाही आम्ही सत्तेत असूनही विरोधात असल्यासारखे वागणूक दिली जाते. लोकांचे काम सोडवले तरच काम करता येईल आपल्या कडे असंख्य लोक शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार असूनही त्यांना आमिष दाखवून त्यांना पक्षप्रवेश होऊ दिले जात नसल्याचे यावेळी गेवराई तालुकाप्रमुख उद्धव मडके यांनी खंत व्यक्त केली.
यावेळी जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी उपस्थित शिवसैनिकांना बोलताना सांगितले जर आपले काम कोणी अधिकारी अडवत असेल तर त्याची बदली जम्मू कश्मीरला करण्याची ताकद आपल्यात आहे आणि शिवसैनिकांवर कोणी डोळे करून बघत असेल तर तो वैयक्तिक माझ्याकडे बघत असेल असं समजून त्याची गई केली जाणार नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तुम्ही उभे रहा निवडणूक लढवा तुम्हाला पक्ष ताकद देईल सर्व सामान्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले कामे सांगा लाडकी बहीण योजना ही शिंदे साहेबांनी आणली तसेच गेवराई शहरात जे अतिक्रमण धारकांना पीटीआर वाटप झाले ते एकनाथ शिंदे साहेबांच्या कृपेमुळे सर्वसामान्यांचे कामे सोडवा बुथ बांधणी करा.
यावेळी शिवसेना पक्षात प्रवेश झालेल्या सर्वांचे आभार जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी मानले .
जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बोलताना सांगितले कि ग्रामीण भागात बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेबांना मानणारी खूप मोठी टीम आहे त्या शिवसैनिकांना सोबत घ्या त्यांची भेट घ्या. येत्या निवडणुकीत त्यांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा झेंडा फडकवायचा आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की जिल्हा नियोजन समिती बाबत आतापर्यंत पालकमंत्री यांचा निरोप आला नाही निश्चितच या पुढच्या काळात त्यांचा निरोप येईल व गेवराई साठी निधीदेखील दिला जाईल असे यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी सांगितले.
गेवराई विधानसभा आढावा बैठकीदरम्यान मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक , जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर, युवा सेना जिल्हा प्रमुख रविराज बडे, युवा सेना जि. समन्वयक महेश चव्हाण, सुहास तांबरे,जिल्हा उपाध्यक्ष नारायण शिंदे, निलेश वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती .
आढावा बैठकीचे आयोजन शहरप्रमुख मुकेश महाजन यांनी केले तर सुत्रसंचलन सुशिल टकले यांनी केलं.
बैठकीस नवनाथ गवते,बिबीशन मोघे ,उमेश शिंदे अनिल खेडकर, गणेश डेंगळे ,बालाजी कारांडे, नागराज तलवाडे, यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते



