बीड
आई वडिलांची सेवा हे सर्वात मोठे पुण्य:- शांतीब्रह्म नवनाथ बाबा

आई वडिलांची सेवा हे सर्वात मोठे पुण्य:- शांतीब्रह्म नवनाथ बाबा
ब्रम्हनाथ वस्ती येथे हरी कीर्तन संपन्न
Z
बीड (प्रतिनिधी) आज संपूर्ण वारकरी संप्रदायी दिसत आहे तो पंढरपुरातील आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिका मुळे दिसत आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज ,संत सावता माळी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, संत संत चोखामेळा, महाराष्ट्रातील संत परंपरेचा मूळ पाया पंढरपूर, पंढरपूर भगवान पांडुरंगाने येण्याचे कारण आहे आई वडिलांची सेवा. म्हणून आई वडिलांची सेवा हे जगातील सर्वात मोठे पुण्य आहे जगातील सर्वात मोठी ईश्वर भक्ती आहे असे ह भ प गुरुवर्य शांती ब्रह्मा नवनाथ बाबा महाराज यांनी ब्रम्हनाथ वस्ती येथे कीर्तन सेवा मध्ये अभंगाच्या भावार्थ सांगताना भावना व्यक्त केल्या
अभंग विवेचन करताना गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज पुढे म्हणाले की आज हा जो वारकरी दिसत आहे तो फक्त आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिका मुळे दिसत आहे. तरुणाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे आई वडिलांच्या सेवेत संपूर्ण जगाचं हित लपलं आहे
या ब्रम्हनाथ वस्ती येथे अधिकमासा निम्मित अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनात टाळकरी, माळकरी,विणेकरी मृदंगवादक, पेटी वादक शेकडो भाविक भक्त महिला मंडळी, पुरुष मंडळी उपस्थित होते ब्रम्हनाथ वस्ती येथे सर्व भाविक भक्ताना भोजन व्यवस्था करत आली होती



