📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आमदार रोहित पवार रुग्णांच्या भेटीला ; रुग्णांची विचारपूस

आमदार रोहित पवार रुग्णांच्या भेटीला ; रुग्णांची विचारपूस

जामखेड: जामखेड तालुक्यातील साईबाबा हॉस्पिटल ला आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी हॉस्पिटलमधील आरोग्य सुविधा, उपचार प्रक्रिया आणि व्यवस्थापन यांचा आढावा घेतला.

हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्ण संदीप (आण्णा) गायकवाड व इतर रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या या संवेदनशील भेटीमुळे रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी युवा नेते प्रवीण उगले, महेंद्र राळेभात, प्रशांत राळेभात, कुंडल राळेभात, नरेंद्र जाधव, आकाश घागरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार पवार यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले आहे. त्यांच्या या भेटीमुळे आरोग्य व्यवस्थेतील उणिवांकडे लक्ष वेधले गेले असून आगामी काळात सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

*”आमदार साहेब प्रत्यक्ष भेटले, त्यामुळे मोठा दिलासा वाटतो”*

“आमदार साहेबांनी थेट आमच्याशी बोलून तब्येतीची चौकशी केली. आम्हाला काय अडचणी येतात, याची माहिती घेतली. लोकप्रतिनिधी स्वतः रुग्णालयात येऊन विचारपूस करत असतील, तर ते नक्कीच चांगलं आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला.”

Back to top button