बीड
सखाराम जोगदंड यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष शिरुर कासार पदी नियुक्ती… सर्व स्तरातून अभिनंदन

सखाराम जोगदंड यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष शिरुर कासार पदी नियुक्ती…
सर्व स्तरातून अभिनंदन
कोळगाव बाळासाहेब घाडगे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. अजित (दादा) पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा सुनिलजी तटकरे व यांच्या मान्यतेने युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी सखाराम जोगदंड यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष शिरुर कासार पदी नियुक्ती करण्यात येत आहे. या निवडीबद्दल जोगदंड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित दादा पवार आणि पक्षांची विचारधारा सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सक्रिय व्हावे. पक्षाच्या विचाराने पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन पक्ष संघटना मजबुतीने उभी राहावी. पक्षाचे प्रामाणिकपणे काम सुरू राहावे म्हणून पक्षाचे पदाधिकारी म्हणून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शेतकरी जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास आपण सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत या उद्देशाने बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजुरेश्वर चव्हाण, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणी युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी घोषित केल्या आहेत. यामध्ये कमलेश्वर धानोरा येथील युवा कार्यकर्ते सखाराम जोगदंड हे नेहमीच परिसरातील सामाजिक धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत राहुन सर्व सामान्य जनतेची कामे करत नेहमीच सहभागी होत असतात. भविष्यात कभलेश्वर, धानोरा परिसरातील काम सोडवणूक करण्यासाठी शिरूर कासार तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली. या निवडीबद्दल कमलेश्वर धानोरा गावात त्यांचे मित्र मंडळ यांच्या कडून सत्कार करण्यात आला. यावेळी जोगदंड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या जात आहे.



