बीड

संस्थाचालकांनी कर्मचाऱ्यांशी चांगले वागावे – प्रा. सुशीलाताई मोराळे 

संस्थाचालकांनी कर्मचाऱ्यांशी चांगले वागावे – प्रा. सुशीलाताई मोराळे

बीड प्रतिनिधी: – बीड जिल्ह्यात शिरसमार्ग येथील कर्मचाऱ्यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली ही बाब माणुसकीला काळीमा फासणारी असून संस्था चालवणारांनी मालक म्हणून वागू नये आपण फक्त विश्वस्त आहोत ही भावना जपावी असे आव्हान संस्था महासंघाच्या पदाधिकारी प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे.    1980 ते 1990 च्या कालखंडात संस्था चालवण्याची लायकी नसलेल्या अनेकांनी संस्था काढल्या विनाअनुदान, कायम विनाअनुदान, स्वयंअर्थसाहित शाळांना सरकारने मास्टर प्लॅन न बघता धडाधड परवानग्या दिल्या, या धोरणातून अनेक हौशी संस्थाचालक उदयाला आले, त्यांना संस्था आपल्या मालकीची आहे असे वाटायला लागले यातून सरंजामी मानसिकता उदयाला आली अनेक बाबी चुकीच्या पद्धतीने हे नवोदिन संस्थाचालक करीत असल्यामुळे जे संस्थाचालक चांगल्या पद्धतीने काम करतात तेही बदनाम होत आहेत, गाडे सरांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांची पोलीस यंत्रणेने कसून चौकशी करावी, शिक्षक कर्मचाऱ्यांनीही संस्थाचालकांना धरू नये दोघांमध्ये ताळमेळ असणे गरजेचे आहे, अनेक कर्मचारी दारू पितात शाळेवर वेळेवर जात नाहीत, प्रार्थनेला हजर राहत नाहीत, संस्थेने नोटीस दिली की संस्थाचालकालाच बदनाम करतात दोन्ही बाजूने चुका झाल्या की अशा घटना घडतात तरीही संस्थेचे पालक म्हणून संस्थाचालकाची  जबाबदारी मोठी आहे. संस्थाचालकांनी कर्मचाऱ्यांशी नीट वागावे असे आव्हान प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे.

Back to top button