बीड

आनंदऋषिजी हॉस्पिटल, बीड येथे परमपूज्य साध्वी श्री अर्चना जी महाराज (मीरा) यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय विशेष आरोग्य शिबिरांचा शुभारंभ

आनंदऋषिजी हॉस्पिटल, बीड येथे परमपूज्य साध्वी श्री अर्चना जी महाराज (मीरा) यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय विशेष आरोग्य शिबिरांचा शुभारंभ

### **किडनी विकार, मधुमेह व अस्थिरोग रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मार्गदर्शन व विशेष सवलती**

**बीड (प्रतिनिधी) :** जैन सोशल फेडरेशन, अहिल्यानगर संचलित **आनंदऋषिजी हॉस्पिटल, बीड** (जालना रोड, छत्रपती शाहू बँकेजवळ) येथे **परमपूज्य साध्वी श्री अर्चना जी महाराज (मीरा)** यांच्या पावन उपस्थितीत व मंगलपाठाने दोन दिवसीय विशेष आरोग्य शिबिरांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

बदलती जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच वाढते अस्थिरोग यांमुळे नागरिकांच्या आरोग्यासमोरील वाढत्या आव्हानांचा विचार करून या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांना नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला, तपासणी व उपचाराचा लाभ या उपक्रमातून मिळणार आहे.

### **दि. १५ जुलै २०२६ (बुधवार) : मोफत किडनी विकार व मधुमेह तपासणी शिबिर**

सकाळी **११.०० ते दुपारी २.००** या वेळेत आयोजित शिबिरामध्ये **अहमदनगर येथील प्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. गोविंद कासट** रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे **किडनीच्या कार्यक्षमतेची KFT (Kidney Function Test) तपासणी पूर्णपणे मोफत** करण्यात येणार आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, लघवीचे विकार, क्रिएटिनिन वाढलेले रुग्ण, किडनी विकाराचा कौटुंबिक इतिहास असलेले नागरिक तसेच डायलेसिस सुरू असलेले किंवा डायलेसिसची गरज असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

याशिवाय पात्र रुग्णांना **महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना** व **आयुष्मान भारत योजना** अंतर्गत मोफत डायलेसिस सुविधेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

### **दि. १६ जुलै २०२६ (गुरुवार) : भव्य अस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर**

दुपारी **१२.०० ते सायंकाळी ५.००** या वेळेत आयोजित शिबिरामध्ये **अहमदनगर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन धोत्रे** व त्यांची अनुभवी टीम रुग्णांची तपासणी करणार आहे.

गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, मणक्यांचे विकार, जुने फ्रॅक्चर, सांधे झिजणे तसेच इतर अस्थिरोगांवर तज्ज्ञांकडून उपचार व शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

विशेष म्हणजे **संपूर्ण गुडघा व खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुणवत्तापूर्ण इम्प्लांटसह फक्त ₹६५,००० मध्ये** उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र रुग्णांना **महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना** अंतर्गत मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार असून, अपात्र रुग्णांना **मुख्यमंत्री सहाय्यता निधी** संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.

शिबिरादरम्यान **एक्स-रे फक्त ₹२५०**, **CT स्कॅन ₹१०००**, **MRI ₹१७५०** या विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध राहणार असून, **तपासणी शुल्क केवळ ₹१००** ठेवण्यात आले आहे.

या दोन्ही शिबिरांच्या उद्घाटनप्रसंगी **परमपूज्य साध्वी श्री अर्चना जी महाराज (मीरा)** यांच्या पावन उपस्थितीचा लाभ मिळणार असून, बीड शहरातील सर्व जैन संप्रदायाध्यक्ष, समाजबंधू-भगिनी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवाभावी उपक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

### **नोंदणी व संपर्क :**

📞 **८२६२००९०९१ / ९८५००७७३६१**

Back to top button