रत्नागिरी

खराब रस्त्या बाबत १९ मे च्या लोकशाही दिनात विचारणार जाब सक्षम अधिकारी यांना हजर करावे – गुहागर प्रेमी नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

खराब रस्त्या बाबत १९ मे च्या लोकशाही दिनात विचारणार जाब सक्षम अधिकारी यांना हजर करावे – गुहागर प्रेमी नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

आबलोली (संदेश कदम)
गुहागर शहर ते तिसरे वाकण शासकीय विश्रामगृह या दरम्यान खराब रस्त्यावर चांगले कार्पेट मारून मिळावे या मागणी साठी सातत्याने नागरिक स्थानिक प्रशासनाकडे मागणी करीत आहेत मागील लोकशाही दिनात दिलेले वचन न पाळल्याने केवळ पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकण्यात आली मात्र आज आंदोलनची दिशा निश्चित करण्यासाठी बोलावलेल्या पदाधिकारी यांचे बैठकीत येणाऱ्या १९ मे च्या लोकशाही दिनात या बाबत नागरिक जाब विचारणार आहेत या लोकशाही दिनात गुहागर प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग चे सक्षम अधिकारी यांना तयारी निशी बोलवावे अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.गुहागर प्रेमी नागरीकांची हि सभा गुहागर तालुक्यातील मोडका आगर येथील विशाल बोटिंग क्लब येथे अनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली.
या वेळी योग्य दिशेने आंदोलन करण्याचे निश्चित झाले असून आमच्या मागण्या तालुक्यातील प्रशासना द्वारे पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला तसेच पी एम कोर्टात या खराब रस्त्याबाबत तक्रार करण्याचे ठरले तसेच जिल्हा स्तरावरील अत्यावश्यक सेवे च्या पोर्ट वर नागरिकांनी मोठया संख्येने तक्रारी कराव्या तसेच १९ मे च्या लोकशाही दिनात या कामाबाबत सकारात्मक उत्तर मिळाले नाही तर मात्र लाक्षणिक उपोषण करण्यासही घोषीत करण्यात आले आहे. याबाबतीत दिवस निश्चित करण्यासाठी गुहागर शहर परिसरातील नागरीकांना विश्वासात घेऊनच हे उपोषण सन्मार्गाने छेडले जाईल असा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे .
या बैठकीला मुंबईचे मनोहर घुमे, विश्वनाथ रहाटे, अनिल शिंदे, नितीन खानविलकर, अरुण भूवड, अनिल रावणंग, जेष्ठ पत्रकार पराग कांबळे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यामध्ये गुहागर तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी राजकारण विरहित विकासासाठी गुहागर फोरम निर्माण करण्यासाठी आजच्या सभेत विशेष चर्चा करण्यात आली. या चर्चेत गुहागर तालुक्यातील आरोग्य सेवा व परप्रांतीय रोखण्यासाठी काय उपाय योजना कराव्या याबाबत मनोहर घुमे व नितिन खानविलकर यांनी महत्वाची भूमिका मांडली. या सभेला गुहागर प्रेमी नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते. शेवटी विश्वनाथ रहाटे यांनी सर्वांचे आभार मानले

Back to top button