📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीडमध्ये मोरया गणेश मित्र मंडळाचा दिमाखदार अनावरण सोहळा!

बीडमध्ये मोरया गणेश मित्र मंडळाचा दिमाखदार अनावरण सोहळा!
जालन्याहून आणली बीड जिल्ह्यातील सर्वात उंच १९ फूट प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती; ढोलपथक व फायर शोने रंगली सोहळ्याची रंगत
बीड | प्रतिनिधी
मोरया गणेश मित्र मंडळ, छ. शिवाजी नगर, बीड यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त भव्य-दिव्य नियोजन करण्यात आले असून, मंडळाच्या वतीने जालना येथून बीड जिल्ह्यातील सर्वात उंच १९ फूट प्रभू श्रीरामाची आकर्षक मूर्ती आणण्यात आली आहे. या भव्य मूर्तीचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
अनावरण सोहळ्यावेळी परिसरात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दमदार ढोलपथकाच्या तालावर उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर आकर्षक फायर शोने सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रम डी.जे.मुक्त वातावरणात पार पडल्याने पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात सोहळा संपन्न झाला.
मंडळाने यंदा साकारलेली १९ फूट उंच प्रभू श्रीरामाची मूर्ती ही बीड जिल्ह्यातील विशेष आकर्षण ठरत असून, मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मंडळाच्या या भव्य संकल्पनेचे परिसरातील नागरिक व गणेशभक्तांकडून कौतुक होत आहे.
या सोहळ्यास अजिंक्य भैय्या शिराळे, कृष्णा काकडे, अमर ढास, मराठा सेवक प्रशांतराजे रसाळ, शिवम काळकुटे पाटील,साहिल शिराळे यांच्यासह मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भव्य मूर्ती, आकर्षक सजावट, ढोलपथक आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे मोरया गणेश मित्र मंडळाचा हा अनावरण सोहळा बीड शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
Back to top button