राम पवार यांची भाजप भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी निवड

राम पवार यांची भाजप भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी निवड
जामखेड प्रतिनिधी, दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी जामखेड शहर मंडलच्या कार्यकारिणीत रामदास कंठीलाल पवार यांची भटक्या मुक्त आघाडी प्रमुख या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा पत्र दिले आहे. प्रा. शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे की, रामदास पवार यांचे नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि समाजातील कार्य हे पक्षासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी केलेले जनहिताचे कार्य निश्चितच यशस्वी ठरेल.
या निवडीमुळे जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड संघटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते आहे.
रामदास पवार हे पक्षसंघटन मजबूत ठेवण्यासाठी आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक भाजपला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.



