बीड

आजही मराठा समाजावर जरांगे पाटील यांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट

आजही मराठा समाजावर जरांगे पाटील यांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट

मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुडेगावच्या युवकांना दिलेली जिम्मेदारी पुर्णत्वास

*अंबाजोगाई प्रतिनिधी, बालाजी देशमुख*
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईला जाण्याची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने अचानक तालुक्यातील मुडेगाव येथे जरांगे पाटील सोमवार दि. 14 जुलै दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान दाखल झाले होते तर त्या बैठकीत मुडेगावच्या युवकांनवर शंभर गावात चावडी बैठका घेऊन 29आँगस्ट रोजी मुंबई ला मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मध्ये होणाऱ्या मराठा आरक्षण लढयात मराठा समाजाने मोठया संख्येने सहभागी व्हावे या साठी युवकांनी चावडी बैठकांचा सपाटा लावला आहे. मुडेगाव या गावावर दिलेली शंभर गावची जिम्मेदारी मुडेगाव गावातील युवक अतिशय चोखपणे पार पाडत आहेत असे लातूर इथल्या बैठकीत सगळ्यात बोलत असताना मनोज दादा यांनी मुडेगाव गावातील युवकांचे कौतुक केले तसेच मुडेगावील गावातील युवकांनी आत्तापर्यंत 50 ते 60 गावांना भेटी दिल्या त्यातील काही प्रमुख गावे मोटेगाव लखमापूर पळशी धानोरा देवळा सारसा वांजरखेड गादवड बनसारोळा आवसगाव नायगाव कौडगाव अकोला तडोळा वाकडी बोडका जोडजवळा वाघाळा भारज नांदगाव सुगाव इत्यादी गावाला जाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पोटतिडकीने सरकारकडे मांडून देखील वेळ काढू पणा होत असल्याने सकल मराठा समाज मनोज दादा जरांगे याच्या नेतृत्वाखाली मुंबई ला जाणार आहे.या
ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्खेने सहभागी होण्याचे आवाहन देत आहेत
गावातील युवकांनी चावडी बैठकी घेतल्या त्यातील प्रत्येक गावाने अतिशय छान असा प्रतिसाद दिला
मुडेगावातील युवक दादांनी दिलेली जबाबदारी अतिशय तळमळीने पार पाडत आहेत.

Back to top button