📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीय

तुषार बोथरा यांच्या तक्रारीनंतर नगर परिषदेची तात्काळ कारवाई ; मानले, मुख्याधिकारी साळवे यांचे आभार

जामखेड :
जामखेड शहरातील बीड कॉर्नर परिसरात शुक्रवारी सकाळी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. दुर्गंधीचा त्रास होत असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तुषार बोथरा यांनी तात्काळ नगर परिषद मुख्याधिकारी अजय साळवे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.

मुख्याधिकारी साळवे यांनी त्वरित प्रतिसाद देत संबंधित कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. कर्मचाऱ्यांनी परिसराची स्वच्छता मोहीम राबवून दुर्गंधीवर नियंत्रण मिळवले. या जलद कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परिसरातील स्वच्छतेबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून, नगर परिषदेच्या तत्परतेचे बोथरा यांनी कौतुक करत मुख्याधिकारी अजय साळवे यांचे आभार मानले.

बोथरा यांनी सांगितले की, मुख्याधिकारी साळवे साहेबांनी तातडीने कारवाई करत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.

Back to top button