बीड
रेणापूर येथे ग्रामबाल संरक्षण समिती सदस्याचे प्रशिक्षण संपन्न.

रेणापूर येथे ग्रामबाल संरक्षण समिती सदस्याचे प्रशिक्षण संपन्न.
तालुक्यातील ग्रामबाल संरक्षण समितीचा उत्स्फुर्त प्रतिसाद.
गावागावातील शाळाबाह्य मुले थांबवून शाळेच्या प्रवाहात आणल्यास बालविवाह थांबवण्यासाठी तसेच बाल स्नेही गाव करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामबाल संरक्षण समितीने पुढाकार घ्यावा आणि बालकांचे प्रश्न गावातच सुटावेत यासाठी रेणापुर येथे कलापंढरी सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक ९ जून रोजी सोमवारी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभाग्रहात ग्रामबाल संरक्षण समितीचे तालुका स्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार शेख होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी क्रष्णा भराडीया, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोविंद काळे,बाल न्याय मंडळाच्या सदस्या अॅड छाया मलवाडे,शिवदर्शन सदाकाळे,पानगाव ग्रामबाल संरक्षण समितीचे सदस्य बाबा हलकुडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गटशिक्षणाधिकारी क्रष्णा भराडीया म्हणाले की प्रतेक गावात एक ही शाळाबाह्य मुल राहू नये सर्व मुले शाळेच्या प्रवाहात आसतील तर बालविवाह निश्चित थांबतील या साठी शिक्षण विभाग आणि कलापंढरी संस्था तसेच ग्रामबाल संरक्षण समिती मिळून काम करु . या नंतर बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहीती शिवदर्शन सदाकाळे यांनी दिली या वेळी कायद्याची संकल्पना बालविवाहाची कारणे, व बालविवाह केल्यास शिक्षेची तरतुद या विषयी सविस्तर माहिती दिली. तर बाल न्याय मंडळाच्या सदस्यांमध्ये अॅड छाया मलवाडे यांनी बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा या कायद्याची संकल्पना, केलेल्या गुन्ह्यात शिक्षेची तरतुद , तसेच बाल संरक्षण समितीची सविस्तर माहिती दिली. या वेळी कार्यकमाला रेणापुर तालूक्यातील पानगाव बिटरगाव, गरसुळीतांडा,टाकळगाव, दामोदरतांडा, गोविंद नगर ,तत्तापुर, भंडारवाडी, बिटरगाव तांडा, तळणी आदींसह अनेक गावातून ग्रामबाल संरक्षण समितीचे पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी धनराज पवार, मधुकर गालफाडे, सुप्रिया गोरे, सुप्रिया रामदासी, आदी सह कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.



