📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
अहमदनगर

खासदार निलेश लंके यांचे बाफना परिवाराला सांत्वन

खासदार निलेश लंके यांचे बाफना परिवाराला सांत्वन

जामखेड : शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती स्व. संपतलाल बाफना यांच्या सौभाग्यवती व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष महावीर बाफना आणि गौतम(दादा)बाफना यांच्या मातोश्री स्व. किरणबाई संपतलाल बाफना (वय ७२) यांचे २३ सप्टेंबर रोजी पहाटे आकस्मिक निधन झाले होते.शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती स्व. संपतलाल बाफना यांच्या पत्नी तसेच वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष महावीर बाफना व गौतम बाफना यांच्या मातोश्री स्व. किरणबाई संपतलाल बाफना (वय ७२) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर आहिल्यानगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांनी आज (१ ऑक्टोबर) रोजी जामखेड येथील बाफना परिवाराच्या निवासस्थानी भेट देऊन आपले सांत्वन व्यक्त केले.
यावेळी त्यांनी बाफना परिवाराशी संवाद साधत दुःखातही आम्ही तुमच्या सोबत आहोत. या कठीण प्रसंगी धैर्याने उभे राहण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते प्रा.लक्ष्मणराव ढेपे, भाजपा व्यापारी संघटना अध्यक्ष पिंटूशेठ बोरा, राष्ट्रवादी चे नेते संपत राळेभात,अभय बाफना,पवन राळेभात,आकाश बाफना, महेंद्र राळेभात,मंगेश बेदमुथ्था, संजय डोके, अनिल रेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button