📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमात राजुरीची शाळा ठरली आदर्श

स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमात राजुरीची शाळा ठरली आदर्श

तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक ; २ लाखांचा पुरस्कार

जामखेड – मुख्यमंत्री स्वच्छ शाळा, सुंदर शाळा टप्पा २ अंतर्गत दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी (ता. जामखेड) या शाळेने स्वच्छता, सुशोभीकरण व शैक्षणिक वातावरणाच्या निकषांवर उत्तम कामगिरी करत तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुण चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, संचालक डॉ. प्रताप गायकवाड, शिवाजी तंठक, दीपक होशिंग, दत्तात्रय वडे, रामनाथ परदेशी, दिलीप चौकटे आदींनी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष निलेश कोल्हे,मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, राजेंद्र पवार,श्रीमती सुनीता पिसाळ, सुभाष बोराटे, जुबेर सय्यद, क्षीरसागर विजय, अक्षय मोहिते, शशिकांत सदाफुले,अनिकेत चौभारे,उमराव लटपटे,हनुमान राऊत आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तत्कालीन मुख्याध्यापक बाळासाहेब पारखे यांच्या प्रयत्नातून हे यश मिळाले आहे.
या कामगिरीबद्दल शाळेला रुपये दोन लाखांचा धनादेश गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल राजुरी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले,विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोहिते,राम निकम,विक्रम बडे, सुनील भामुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री स्वच्छ शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत शाळांची निवड करताना परिसराची स्वच्छता, शौचालयांची स्थिती, पिण्याच्यात पाण्याची सुविधा, शाळेचे सौंदर्यीकरण, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शैक्षणिक परिसराचा एकूण शिस्तबद्धपणा यावर भर देण्यात आला. या सर्व बाबींमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, राजुरीने उत्तम कामगिरी करीत तालुका स्तरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले.

Back to top button