बीड
अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली भेट

अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली भेट
मराठा आरक्षण आंदोलनाला सक्रिय पाठिंबा
बीड (प्रतिनिधी)दि.२७ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. बुधवारी (दि.२७) त्यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे प्रस्थान करत आहेत. त्याआधी अंतरवली सराटी येथे भेटीदरम्यान डॉ.क्षीरसागर यांनी आंदोलनासोबत राहण्याची ग्वाही दिली. गरजवंत मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवून त्यांनी आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
डॉ.योगेश क्षीरसागर यांचा कायम सहभाग
समाजकारण, राजकारणात सक्रिय झाल्यानंतर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मराठा आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवला आहे. पहिल्यांदा दि. ८ मार्च २०१८ रोजी बीडमध्ये झालेल्या जनसुनावणीत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डॉ. लिमसे यांना स्वतः निवेदन देऊन आरक्षणाची मागणी केली.
दि.७ सप्टेंबर २०२३ रोजी बीडजवळील महालक्ष्मी चौक येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला.
दि.३० ऑक्टोबर २०२३ रोजी समाजाच्या भावना लक्षात घेऊन मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. त्याच दिवशी पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला.
दि.९ सप्टेंबर २०२३ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सकल मराठा शिक्षक, प्राध्यापक, कोचिंग क्लासेस प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या धरणे आंदोलनातही सहभाग घेऊन लढ्यात साथ दिली.
याशिवाय, मनोज जरांगे पाटील यांच्या विविध बैठका, आंदोलनाशी संबंधित कार्यक्रमात ते नेहमीच उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.



