बीड

अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत , ७,०६,०००/- रु.चा मुद्देमाल जप्त

अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत , ७,०६,०००/- रु.चा मुद्देमाल जप्त
 प्रतिनिधी भंडारा: रात्रीला पोलीस गस्त करीत असता  आरोपी नामे राहुल हरीभाउ बडवाईक, वय ३१ वर्ष रा. भगतसिंग वार्ड, टाकळी हा त्याचे ताब्यातील एक निळ्या पांढ-या रंगाचा स्वराज कंपनीचा ७३५ एक्स.टी. ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६/झेड. ७०९१ किंमती ६,००,०००/- रू. ०१ ब्रास रेती किमती ६,०००/-रू. ट्रॉली किंमती १,००,०००/- रू. असा एकूण ७,०६,००/- रू. चा मुद्देमाल अवैधरित्या विना पास परवाना रेती वाहतुक करताना मिळून आल्याने फिर्यादिच्या लेखी रिपोर्ट वरून कायमी अप क्र. ९७८/२०२५ कलम ३०३ (२) मा.न्या.सं. सहकलम ७, ९ पर्यावरण संरक्षण अधि. मोवाका अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही  पोलीस अधीक्षक नूरुल हसन . अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , पोनि चिंचोळकर  यांच्या मार्गदर्शनात पोहवा मस्के, पोहवा. दोनोडे स्था.गु.शा.. यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन भंडारा चे अधिकारी करीत आहेत.
Back to top button