बीड

आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड येथे आस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड येथे आस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

रविवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजन

बीड (प्रतिनिधी): राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि संत आदर्श ऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, जैन सोशल फेडरेशन अहमदनगर संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल, जालना रोड, शाहू बँकेजवळ, बीड येथे रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मनके व सांधे बदली, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अशा अस्थिरोगांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. महागड्या वैद्यकीय सेवेमुळे सर्वसामान्य रुग्णांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता अत्यल्प दरात उच्च दर्जाची सेवा देण्याचा उद्देश या शिबीरामागे आहे.

या शिबिरात संपूर्ण गुडघा व खुबा प्रत्यारोपण अवघ्या ₹६५,००० मध्ये गुणवत्तापूर्ण इम्प्लांटसह उपलब्ध असणार आहे. तसेच, ‘महा फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे. याशिवाय, जे रुग्ण या योजनेसाठी पात्र नाहीत, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CM Relief Fund) अंतर्गत उपचार मिळवून देण्यात येणार आहेत.

प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन धोत्रे (अहमदनगर) व त्यांच्या सहकारी तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. तपासणीसाठी नोंदणी शुल्क फक्त ₹१०० असून, इच्छुकांनी मो. ८२६२००९०९१ / ९८५००७७३६१ या क्रमांकावर संपर्क साधावा. वेळेअभावी नोंदणी न करता आलेल्या रुग्णांचीही तपासणी करण्यात येणार आहे.

आनंदऋषीजी हॉस्पिटल हे आपल्या दर्जेदार वैद्यकीय सेवांसाठी राज्यभर प्रसिद्ध असून येथे १,३०० हून अधिक कर्मचारी व २५० पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. हजारो रुग्णांनी येथे उपचार घेऊन आरोग्य लाभले आहे.

सर्व बीडकर व परिसरातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे सकल जैन समाज, बीड यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button