मंडणगड येथे ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ “तिरंगा रॅली”

मंडणगड येथे ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ “तिरंगा रॅली”
मनामनात तिरंगा..
श्वासाश्वासात तिरंगा…
रोमारोमात तिरंगा..
मंडणगड प्रतिनिधी
ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ आज मंडणगड येथे “तिरंगा रॅली”
जम्मू कश्मीर मधील पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले व दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला.
भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी मंडणगड शहर नगरपंचायत ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल अशी आज सर्वपक्षिय सर्व मान्यवरांसह, माजी सैनिकांच्या नागरिकांच्या उपस्थितीत भव्य “तिरंगा रॅली” चे आयोजन करण्यात आले असता, या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’ ‘भारत माता की जय, जय हिंद’ ‘भारतीय जवानांचा विजय असो'”वंदे मातरम”जय जवान जय किसान” अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा केला गेला.
तिरंगा रॅलीचे नगरपंचायत संकुल येथे आगमन झाल्यानंतर त्याठीकाणी मान्यवर,माजी सैनिक, यांची सैन्याच्या प्रती कौतुक करणारी भाषणे झाली त्यानंतर मृत पर्यटक,दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीत गाऊन तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला.



